अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

माहितीनुसार  मृतक ऋषभ हा हिंगणघाट येथे एका ऑटोमोबाईलच्या दुकानात कामावर होता. तो काल रात्री दहा वाजताच्या सुमारास दुकानातील काम आटोपून दारोडा गावी येत असताना नागपूर- हैदराबाद महामार्गावर घाटसावली गावाजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली.

वडनेर.  काम आटोपून दुचाकीने गावी परत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.  ही घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणा-या घाटसावली गावाजवळ घडली. ऋषभ संजय हटवार रा. दारोडा असे  मृतक युवकाचे नाव आहे.

माहितीनुसार  मृतक ऋषभ हा हिंगणघाट येथे एका ऑटोमोबाईलच्या दुकानात कामावर होता. तो काल रात्री दहा वाजताच्या सुमारास दुकानातील काम आटोपून दारोडा गावी येत असताना नागपूर- हैदराबाद महामार्गावर घाटसावली गावाजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला.  माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी घटनेची नोंद करून ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.