100 कोटींचा घोटाळा? शिवसेना खासदार भावना गवळींना जबरदस्त झटका! महिला उत्कर्ष प्रतिष्ठान कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक

वाशिम- यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी(shivsena MP Bhavana Gawli) यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान मध्ये बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्या प्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांची काही दिवसांपूर्वी सक्त वसुली संचलनालयाकडून चौकशी झाली होती. मात्र आता त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे(ED arrests Saeed Khan, director of MP Bhavana Gawli's Mahila Utkarsh Pratishthan Company). मात्र ही अटक बेकायदेशीर आहे, असा दावा त्यांचे वकील इंद्रापाल सिंह यांनी केला आहे.

    वाशिम : वाशिम- यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी(shivsena MP Bhavana Gawli) यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान मध्ये बदल करुन त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्या प्रकरणी या कंपनीचे संचालक सईद खान यांची काही दिवसांपूर्वी सक्त वसुली संचलनालयाकडून चौकशी झाली होती. मात्र आता त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे(ED arrests Saeed Khan, director of MP Bhavana Gawli’s Mahila Utkarsh Pratishthan Company). मात्र ही अटक बेकायदेशीर आहे, असा दावा त्यांचे वकील इंद्रापाल सिंह यांनी केला आहे.

    आगामी काळात गवळी यांच्या चौकशीची शक्यता

    खान हे ईडीकडून देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याबरोबरच तपासात सहकार्य करत असतानाही त्यांना अटक करण्यात आल्याबद्दल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. भावना गवळी ज्या कंपनीच्या चौकशीसाठी खान यांना अटक करण्यात आली त्याच कंपनीमध्ये संचालक होत्या. त्यामुळे आगामी काळामध्ये गवळी यांची या प्रकरणामध्ये चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

    ईडीसमोर हजर राहण्यासाठी १५ दिवसांचा अवधी

    मागील काही दिवसांमध्ये गवळी यांच्यासंदर्भातील हे दुसरे प्रकरण आहे ज्यामध्ये ईडीने कारवाई केली.  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागील महिन्यात भावना गवळी यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याच्या आरोप केला होता. त्यानंतर गवळी यांच्या दोन निकटवर्तीय सहकाऱ्यांना ईडीसमोर हजर राहण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशी संबंधित दोन व्यक्तींना ईडीने समन्स पाठवले होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले होते. दोघांनाही ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर रहावे असे या समन्समध्ये म्हटले होते. मात्र या दोन्ही व्यक्तींनी खासगी कारण देत आपल्याला ईडीसमोर हजर राहण्यासाठी १५ दिवसांचा अवधी घ्यावा अशी मागणी ६ सप्टेंबर रोजी केली होती.