Extensive ward wise map in Washim Municipal Council elections

या आगामी २०२२ नगर परिषद निवडणूकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेला प्रभाग निहाय नकाशा आता अनेकांची डोके दुःखी ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे. कारण, ज्या प्रभागाची नियोजित जागा तटबंदी ही वाढल्यामुळे आता या ईच्छुक उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

    वाशिम : वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीची इच्छुक उघड्या डोळयाने वाट पाहत आहे. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्णमृगराज एस यांनी वाशिम नगर परिषदेच्या वाढीव असलेल्या प्रभाग निहाय नकाशा प्रसिध्द करुन आजी माजी नगर सेवक व ईच्छुकांसाठी वाशिम नगर परिषदेच्या आवारात हा नकाशा झळकविण्यात आला. येथे आजी व माजी नगर सेवकांची एकच गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ही प्रभाग रचना राजकीय हेतू असल्याची चर्चा आता सर्वत्र पसरत आहे.

    या आगामी २०२२ नगर परिषद निवडणूकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेला प्रभाग निहाय नकाशा आता अनेकांची डोके दुःखी ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे. कारण, ज्या प्रभागाची नियोजित जागा तटबंदी ही वाढल्यामुळे आता या ईच्छुक उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गेल्या २०१७ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या निवडणूकीत तीस नगर सेवक निवडून आले होते. तेव्हाच्या प्रभाग रचनेत या वर्षी प्रारुप बदलून चुकलेल्या प्रभागाची पुर्नरचना करुन त्या प्रभागाला वाढीव तटबंदी निर्माण केली आहे. त्यामुळे, आता ज्या प्रभागात गेल्या पाच वर्षापुर्वी असलेले मतदान या वर्षी वाढलेले आहे. तर, काही प्रभागातील मतदान   पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे, आता कोणत्या प्रभागात आपले भवितव्य आजमावे, असे प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडले आहेे.

    गेल्या पाच वर्षाच्या निवडणूकीत ज्या प्रभागातून नगर सेवक निवडून आले होते. त्यांना या वर्षी आपले भाग्य आजमावतांना माहिती  नसलेल्या वाढीव प्राभागात फिरावे लागणार आहे. मात्र, काही नगर सेवकांनी याबाबत आक्षेप घेतल्याचे समजते. या प्रभाग रचनेला पुर्नगठीत करुन योग्य पध्दतीने समान प्रभाग निहाय तटबंदी तयार करावी, अशी मागणी आज माजी नगर सेवकांकडून होत आहे. या वाढलेल्या प्रभागात माजी नगर सेवकांच्या वाढीव प्रभागाची पुर्नरचना झाल्याचे नेमके कारण काय ? असा सवाल आता वाढलेली तटबंद बाबत होत आहे. मग, नेमक्या न वाढलेल्या प्रभागाचा फायदा कोणत्या पक्षाला होणार याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहे.

    मनिष माधवराव चिपडे या समाजसेवक युवकाने वाढीव व चुकीच्या रचनेबाबत मुख्य निवडणूक आयोगाकडे जानेवारी २०२२ मध्ये केली असून या रचनेतून नगर परिषद अधिकार्‍यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर, याबाबत एकवेळ जिल्हाधिकारी यांच्याकडे एकवेळ सुनावणी झाली असून आता १४ मार्चला पुढील सुनावणी होणार असल्याचे मनिष चिपडे यांनी सांगितले. २०२२ नगर परिषद निवडणूकीसाठी एकुण १६ प्रभाग असून या प्रभागातुन एकुण ३२ नगर सेवक आपले भाग्य आजमावणार आहे.  या सर्व प्रभागात एकूण मतदार लोकसंख्या ७८३८७ मतदार आहेत, या मध्ये एससी मतदार १४८३७ तर, एसटी मतदार ११२९ एवढे असून  मात्र, अद्यापही ओबीसीचे मतदान किती याबाबत संभ्रम कायम आहे.