वाशीम जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी; ३०६ बाधित

    वाशीम.  25 मार्च रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना महामारीने चार जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये कारंजा तालुक्यातील बांबर्डा येथील 65 वर्षीय व्यक्ती, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील 70 वर्षीय व्यक्ती, मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील 65 वर्षीय व्यक्ती व मंगरुळपीर तालुक्यातील जांब येथील 80 वर्षीय व्यक्तीचा 24 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 306 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याबाहेरील 15 बाधितांची नोंद झाली असून 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.