प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सध्या बदलत्या वातावरणामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. दुपारी उन्हाचा तडाखा, सकाळी गारवा तर मध्येच ढगाळ वातावरण असा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. या वातावरणात आरोग्याचा समतोल टिकून ठेवण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागत आहे.

    शिरपूर जैन (Shirpur Jain).  सध्या बदलत्या वातावरणामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. दुपारी उन्हाचा तडाखा, सकाळी गारवा तर मध्येच ढगाळ वातावरण असा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. या वातावरणात आरोग्याचा समतोल टिकून ठेवण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागत आहे.

    बदलत्या वातावरणाचा फटका लहान मुले व वृद्ध नागरिकांना जास्त बसत आहे. अशातच कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असून, आजार कोणताही असला तरी नागरिकात कोरोना या संसर्गाचे भूत डोक्यात शिरत आहे. दिवसभर उन्हाचा पारा वाढत असल्याने चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. उन, गारवा आणि ढगाळ वातावरण अशा तिहेरी वातावरणामुळे ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत वाढ होतांना दिसत आहे. छोटे-मोठे आजार वाढत असल्याने दवाखान्यातही रुग्णांची गर्दी आहे.

    कोरोनाच्या भीतीने अनेकजण दवाखान्यात कडे जाण्याचे टाळतही आहेत. ग्रामीण भागात सध्या शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी जवळपास पूर्ण झाली. शिरपूर व परिसरात शेतकरीवर्ग आता हळद काढणे, वेचणे तथा इतर प्रक्रिया कामाला लागले आहेत. गत दोन दिवसापासून ढगाळ वातावरण दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.