आता शिवसेनेकडूनही गडकरींना जाणार पत्र, शंभूराज देसाई यांनी केला खुलासा

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकाची तक्रारच केली होती. त्यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. अखेर सेनेकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

  वाशिम : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकाची तक्रारच केली होती. त्यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. अखेर सेनेकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

  दरम्यान ‘कामात कुणीही अथवा शिवसेनेने महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण केला नाही’, असं सेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खुलासा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी तसंच रस्तेविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

  शंभूराज देसाई नेमकं काय म्हणाले?

  रस्ते कामात कुणीही अथवा शिवसेनेने महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण केला नाही. त्यामुळं गडकरी यांनी जे पत्रात लिहिलं आहे, तसं काही झालं नसल्याचं समजलं आहे. मी आता या विषयी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून कळविणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितलं. शिवाय यापुढे विकास कामात कोणीही अडथळा निर्माण केला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश ही दिले आहे आहेत.

  बच्चू कडू यांनी केलं नितीन गडकरींचं कौतुक

  बुलडाणाच्या शेगावमध्ये राज्य मंत्री बच्चू कडू आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरींवर बच्चू कडू यांनी ही स्तुती सुमने उधळल्याचं आज पहायला मिळालं. ‘केंद्रातील वरिष्ठ नेत्यांवर बोलताना बाकीचे भाषण करतात, आणि नितीन गडकरी काम करतात’, असा टोला लगावत नितीन गडकरींवर बच्चू कडू यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.