आंबा प्रक्रियेचे ऑनलाईन मार्गदर्शन; जिल्ह्यात रोजगार निर्मितीची संधी

आंबा पिकाचे उत्पादन देशात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून आंबा हे फळ बाजारात 90-100 दिवस उपलब्ध असते. आंब्याला वर्षभर मागणी आहे. त्यामुळे आंबा प्रक्रिया उद्योगातून रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते.

    रिसोड (Resode). आंबा पिकाचे उत्पादन देशात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून आंबा हे फळ बाजारात 90-100 दिवस उपलब्ध असते. आंब्याला वर्षभर मागणी आहे. त्यामुळे आंबा प्रक्रिया उद्योगातून रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. यासाठी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबा प्रक्रियेतून मुल्यवर्धित आंब्याचे टिकावू पदार्थ, रोजगार निर्मितीची संधी या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले.

    भविष्यात आंबा पिकाच्या उत्पादनातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी आहेत. या संधीचा उपयोग घेता यावा, यासाठी आंबा प्रक्रियेतून रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी कृषी केंद्राच्या वतीने ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आर.एल.काळे यांनी महिलांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून सक्षम व्हावे, असे आवाहन करून कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या महिलाशी निगडीत सेवाची माहिती दिली.

    तसेच कोरोनाकाळ संपल्यानंतर प्रशिक्षणार्थींनी कृषी विज्ञान केंद्र वाशीमच्या प्रक्षेत्रावर असलेलेल्या प्रक्रिया युनिट सोबतच कमी खर्चाचे शेती निविष्ठा निर्मिती केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन केले. शुभांगी वाटाणे यांनीही मार्गदर्शन केले. आंबा उत्पादन वाढीचा भविष्यात योग्यरीत्या वापर करून घेणे महत्त्वाचे असून वाढीव उत्पादनावर प्रक्रिया करणे, ग्रामीण भागातील महिला व ग्रामीण युवक युवती यांच्या माध्यमातून ही बाब पूर्ण होऊ शकते असे सांगितले. प्रशिक्षणामध्ये सहायक प्राध्यापक डॉ. जयश्री मनोहर, डॉ. मंजुषा कदम यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. प्रशिक्षणाचे संचालन एस.आर.बावस्कर यांनी केले.