मुख्यमंत्री ठाकरे आणि अशोक चव्हानांची फक्त भाषणबाजी, मराठा आरक्षणावरून विनायक मेटेंची गंभीर टीका

इतके आमदार, मंत्री असूनही कोणीच मुस्लिमांच्या आरक्षणावर बोलत नाही. कारण त्यांना शिवसेनेच्या वाघाची भीती आहे. वाघ कधी पंजा मारेल आणि पाठीमागून लाथ बसेल आणि सरकारच्या बाहेर पडावे लागेल याची भीती वाटते. त्यामुळे समाज हितापेक्षा यांना सत्ता महत्वाची आहे असा आरोप मेटे यांनी केला.

    वाशिम (Washim) : मराठा समाजाच्या (the Maratha community) मुला-मुलीच्या भवितव्याकरिता जे ओबीसी समाजाला (the OBC community) ज्या काही शैक्षणिक व नौकरीत सवलती आहेत. राजकीय आरक्षण (political reservation) सोडून सवलती मराठा समाजाला द्यायला पाहिजे हे शासनाच्या हातात आहे. शासन ते करत नाही. मात्र, मुख्यमंत्री व अशोकराव चव्हानांची (Chief Minister and Ashokrao Chavan) फक्त भाषणबाजी चालू आहे. हीच खरी लबाडी आहे. हे लबाडांचं सरकार आहे. अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे. ते वाशिम इथ आले असतांना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीला मुस्लिमांची मते पाहिजेत पण ते आरक्षणावर बोलत नाहीत. इतके आमदार, मंत्री असूनही कोणीच मुस्लिमांच्या आरक्षणावर बोलत नाही. कारण त्यांना शिवसेनेच्या वाघाची भीती आहे. वाघ कधी पंजा मारेल आणि पाठीमागून लाथ बसेल आणि सरकारच्या बाहेर पडावे लागेल याची भीती वाटते. त्यामुळे समाज हितापेक्षा यांना सत्ता महत्वाची आहे असा आरोप मेटे यांनी केला.

    अनेक समाज आहेत. यावर कोणी बोलत नाही तर दुसरीकडे ओबीसींचं काम विजय वाड्डटीवार यांच्याकडे आहे. ते मात्र मोर्चे काढत बोंबलत बसले आहेत. आणि तिकडे कोर्टाने निर्णय दिला त्याची पूर्तता करण्याएवजी इकडे मोर्चे काढत बसले. निकाल लागून बसला तेव्हाच जागे झाले असते, नीट काम केलं असतं तर ही वेळ आली नसती अशी टीका विनायक मेटेनी केली आहे.

    म्हणून आम्हाला यांच्यावर विश्वास नाही. तरी या सरकारला सात ते आठ दिवस मुदत देणार आहोत. त्यानंतर हे झाल नाही तर मग बैठक घेऊन सरकार विरुद्ध काय आंदोलन करायचं हे ठरवणार आहोत अशी माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.