Organizing bullock cart Shankar Pat on the occasion of Shiva Jayanti, 2 lakh 21 thousand looted

या बैलगाडी शर्यतीसाठी इतर मान्यवरांच्या कडून या स्पर्धेसाठी दोन लाख २१ हजाराची जंगी लूट केली आहे. या स्पर्धेदरम्यान काडी पुरानी बंद, खो बंद, जिवीत्वाची जबाबदारी ज्याची त्यावर राहणार आहे.

    वाशिम : गेल्या दोन वर्षांपासून कोविड काळात शेतकऱ्यांचा मैदानी खेळ बैलगाडी शंकर पट हा बंद होता. मात्र, काही दिवसांपूर्वी या खेळाला परत परवानगी मिळाली. कोविड नियम नियमांचे पालन करून बैलगाडीचा भव्य शंकरपट दिनांक २२, २३ फेब्रुवारी २०२२ वेळ सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत श्री खंडेश्वर देवळा रोड वाशिम येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य नितीन मडके नियोजन समिती सदस्य यांचे आहे.
    तर, विशेष म्हणजे या बैलगाडी शर्यतीसाठी इतर मान्यवरांच्या कडून या स्पर्धेसाठी दोन लाख २१ हजाराची जंगी लूट केली आहे. या स्पर्धेदरम्यान काडी पुरानी बंद, खो बंद, जिवीत्वाची जबाबदारी ज्याची त्यावर राहणार आहे. यात पंचकमिटी यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. सर्वच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार नियमात राहून अटी व शर्तीचे पालन करावे लागेल. या स्पर्धचे आयोजक शेख हसन सेठ, संजय इंगळे, शामराव इंगळे, गणेश इंगळे, संजय वानखेडे, सुधीर इंगोले यांच्या सहकार्यातून होत आहे.