... so ink and stones were thrown at Kirit Somaiya's vehicles; Shiv Sena MP Bhavana Gawli's factory accused of Rs 100 crore scam

किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेत. किरीट सोमय्या याची पाहणी करण्याकरिता या ठिकाणी आले होते. मात्र, भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक केली. यामुळे किरीट सोमय्या याठिकाणी न थांबताच निघून गेले. पोलिसांना मात्र परिस्थती नियंत्रणात आणण्याकरिता लाठी चार्ज करावा लागला.

    वाशिम : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या ताफ्यातील वाहनांवर वाशिम मध्ये शाई फेक आणि दगडफेक झाली झाली. आक्रमक शिवसैनिकांनी हा प्रकार केल्याचे समजते. यामुळे शिवसेना भाजप वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

    किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेत. किरीट सोमय्या याची पाहणी करण्याकरिता या ठिकाणी आले होते. मात्र, भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक केली. यामुळे किरीट सोमय्या याठिकाणी न थांबताच निघून गेले. पोलिसांना मात्र परिस्थती नियंत्रणात आणण्याकरिता लाठी चार्ज करावा लागला.

    दरम्यान, भावना गवळी यांनी या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. पार्टीकल बोर्ड कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. यामुळे या ठिकाणी जाऊ नये अशा सूचना पोलिसांनी सोमय्या यांना केल्या होत्या. कारखान्यावर जाऊ नका, असे सांगूनही ते गेले, त्यामुळं शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले. त्याचमुळे दगड फेक झाली असावी, असं भावना गवळी यांच म्हणण आहे.

    किरीट सोमय्यांच्या वाहनांवर शाई फेक आणि दगडफेक – पाहा व्हिडिओ