
अर्चना ही विवाहित असून ती आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे. शाहरुखसोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू होते. दरम्यान अर्चना गेल्या काही दिवसांपासून शाहरुखपासून दूर होती. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. ती भेटण्यास ही नकार देत होती. माझे दुसरीकडे प्रेम प्रकरण सुरू असल्याची कबुली तिने शाहरुखला दिली. या बाबीचा राग मनात ठेवून शाहरुखने अर्चनाला यवतमाळच्या स्टेट बँक चौकात बोलावलं. गाडीवर बसवून वीटभट्टी परिसरात नेले. तिथं दोघे बोलत असताना दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी शाहरुखने रागाच्या भरात आपल्या खिशात आणलेल्या कटरने सरळ अर्चनाचा गळा चिरला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत प्रियकर शाहरुख खान बहादूर खानचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता शाहरुखने पोलिसांना माहिती दिली.