प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

दोन दिवसांपूर्वी कापसाला चांगला भाव होता. आता नऊ हजार 500 रुपये भाव मिळत आहे. शेतकरी मोठ्या अपेक्षेने जगत आहे. कापसापासून विविध वस्तूंची निर्मिती केली जाते. मात्र, भाव मिळत नाही. बोंडअळीने नुकसान होत आहे. ते कधीही भरून निघत नाही. 20 क्विंटल कापूस विक्रीसाठी आणला. परंतु, भाव कोणता मिळेल हे सांगता येत नाही.

    यवतमाळ : मागील आठवड्या भरापासून कापसाचे दर साडेनऊ हजारावरून एकदम दहा हजारावर गेला. तर दोन दिवसांपासून हाच कापूस दहा हजार ४०० ते दहा हजार ५०० रुपये प्रति क्विंटलने जाऊ लागला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा आठवडा ऐतिहासिक ठरत आहे.

    कापसाची कमी उपलब्धता आणि बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुले जिल्ह्यातील चार ठिकाणी कापसाच्या दराने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. फुलसावंगी बाजारपेठेत कापसाला सर्वाधिक १० हजार ४००  रुपयांचा विक्रमी दर मिळाला. यवतमाळ, राळेगाव आणि वणी  बाजारपेठेतही कापसाचा दर दहा हजारांच्या ४४० पार झाला. जिल्ह्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात  पहिल्यांदाच कापसाला दहा हजारांहून अधिकचा दर मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला.

    त्यामुळे गत आठ दिवसांपासून कापसाचे दर सारखे वाढत होते. त्यातच सरकीचे दर २८०० रुपयांवरून चार हजार रुपये क्विंटलवर पोहोचल्याने खुल्या बाजारपेठेत कापसाच्या दराला झळाळी मिळाली आहे. पर्यायाने जिल्ह्यात कापसाचे दर विक्रमी १० हजाराचा टप्पा ओलांडू शकले. जिल्ह्यात बुधवारी या एकाच दिवशी ३२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. जिल्ह्यातील यवतमाळ, फुलसावंगी, राळेगाव, वणी, वाढोणाबाजार, कळंब घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर या बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढली. याचवेळी कापसाचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. कापसाचा हमीदर सहा हजार २५ रुपये आहे. तर खुल्या बाजारात कापसाचे दर दहा हजार ४०० रुपये आहेत. जिल्ह्याती  ३५ ते ४० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होते. यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत केवळ ११ लाख लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत कापसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटले आहेत. त्यातच मागणी वाढल्याने दराने उसळी घेतली. मात्र, गत दोन दिवसात कापसाच्या भावात चढ उतार सुरू आहे. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात चिंतेत सापडले आहे.

    कापसाला सध्या दहा हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिहत आहे. सरकारचे धोरण स्पष्ट नाही. आतापर्यंत शेतकर्‍यांच्या पिकाला कधीही इतका भाव मिळाला नाही. सरकारने पिकांना भाव देताना आपले धोरण स्पष्ट केले पाहिजे. कापसाची आवक कमीच आहे. पावसाळ्यात पिकांचे नुकसान कमी झाले असले तरी नुकसान तसे कमीच आहे. पहिल्या वेचात चांगला कापूस निघाला.

    दोन दिवसांपूर्वी कापसाला चांगला भाव होता. आता नऊ हजार 500 रुपये भाव मिळत आहे. शेतकरी मोठ्या अपेक्षेने जगत आहे. कापसापासून विविध वस्तूंची निर्मिती केली जाते. मात्र, भाव मिळत नाही. बोंडअळीने नुकसान होत आहे. ते कधीही भरून निघत नाही. 20 क्विंटल कापूस विक्रीसाठी आणला. परंतु, भाव कोणता मिळेल हे सांगता येत नाही.