नोकरी वाचवायची असेल तर… सरकारी कर्मचारी असलेल्या महिलेकडे S E X ची मागणी; यवतमाळमधील माजी नगराध्यक्षाच्या पतीविरुद्घ गुन्हा दाखल

राळेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असणार्‍या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी माजी नगराध्यक्षाच्या पतीविरुद्घ यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे(Filed a case against the husband of the former mayor who demanded bodily pleasure from the woman Shocking type in Yavatmal).

    यवतमाळ : राळेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असणार्‍या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. या प्रकरणी माजी नगराध्यक्षाच्या पतीविरुद्घ यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे(Filed a case against the husband of the former mayor who demanded bodily pleasure from the woman Shocking type in Yavatmal).

    प्रकाश खसाळे, असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. सदर महिला ही दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत असताना खरेदी व्यवहारात तिच्याकडून काही चुका झाल्या. त्याची वरिष्ठाकडे तक्रार करण्यात आल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

    एक दिवस प्रकाश खसाळे याने महिलेला बोलावले. निलंबनाच्या कारवाईसह न्यायालयातील प्रकरण मागे घेतो, त्यासाठी तीन लाख रुपयासह शरीर सुखाची मागणी केली. पीडित महिलेने या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022