धर्मांतर रॅकेटमधील यवतमाळच्या युवकाला कानपूर एटीएस पथकाने ठोकल्या बेड्या

ATS ने अटक केलेल्या धीरज देशमुख याचे शिक्षण पुसद येथे झाले. त्यामुळे तो पुसद आणि काळी दौलत खान येथेही मुस्लिम युवकांच्या संपर्कात आला होता. मुस्लिम धर्म परिवर्तनासाठी पुसद येथेच त्याचा ब्रेन वॉश करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्याला अटक झाल्याचे ऐकून कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे.

    यवतमाळ : मुस्लिम धर्मांतर रॅकेटमध्ये यवतमाळमधील युवकाला कानपूर येथे एटीएस पथकाने बेड्या ठोकल्या. धीरज जगताप असे मुस्लिम धर्मांतर रॅकेट मध्ये सहभागी असलेल्या युवकाचे नाव आहे. तो यवतमाळच्या पटवारी कॉलनी येथील रहिवासी आहे. साधारण 8 ते 10 वर्षांपूर्वी धीरज जगताप याने मुस्लिम धर्म स्वीकारला. तेंव्हापासून तो मुस्लिम धर्म परिवर्तनच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याची माहिती आहे.

    या अगोदर दिड महिन्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्याच्या पुसदमधील एका डॉक्टरला अटक झाली होती. धीरज जगताप याचे शिक्षण पुसद येथे झाले. त्यामुळे तो पुसद आणि काळी दौलत खान येथेही मुस्लिम युवकांच्या संपर्कात आला होता. मुस्लिम धर्म परिवर्तनासाठी पुसद येथेच त्याचा ब्रेन वॉश करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्याला अटक झाल्याचे ऐकून कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. त्याचा स्वभाव शांत असल्याचे कुटूंबियांनी सांगितले. चार महिन्यापूर्वी त्याच्याशी कुटुंबातील व्यक्तींचा संवाद झाला होता. या प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन नातेवाईकानी दिले.

    स्वभाव शांत, निर्व्यसनी मुलाला गोवल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला. तो मागील काही महिन्यांपासून घरी आला नाही. घरी देखील शांत राहायचा. त्यामुळे धीरज काही चुकीचे करू शकतो, यावर वडिलांचा विश्वास नाही. पुसद येथे शिक्षण घेत असताना तो एका मुस्लिम व्यक्तीच्या घरी भाडेतत्वावर राहत होता. तेथेच त्याने पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले. व्यवसायाच्या निमित्ताने त्याचे नेहमीच पुसद येथे जाणे असायचे. पटत नसल्याने धीरजची पत्नी मागील काही वर्षांपासून विभक्त राहत आहे.

    दरम्यान, पोलिस दलातून निवृत्त झालेल्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.