यवतमाळ तहसील कार्यालयासमोर चाकूच्या धाकावर लूटमार; तिघे जेरबंद

    यवतमाळ (Yavatmal) : येथील तहसील कार्यालयासमोर (Yavatmal Tehsil Office) चाकूच्या धाकावर मोबाईल हिसकावून (snatching a mobile phone) पैशाची मागणी (demanding money) करणाऱ्या तिघांना अवधूतवाडी पोलिसांनी (Avadhutwadi police) मोठ्या शिताफीने जेरबंद केले. यात विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. आरिफ मलनस रज्जाक मलनस (वय 26), शाहनी मोहम्मद अकरम मलनस (वय 28 ) यांच्यासह विधीसंघर्ष ग्रस्त बालकाचा समावेश आहे. प्रसाद बिसेन याला लुटण्यात आले होते.

    याप्रकरणी त्याने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.