व्यावसायिकांची कोरोना चाचणीकडे पाठ

सुरूवातीस व्यापाऱ्यांनी या टेस्टकडे पाठ फिरविली होती़ परंतु, प्रशासनाने अ‍ॅन्टीजेन टेस्ट करा, अन्यथा दुकाने उघडू देणार नाही, अशी सक्त ताकीद दिली. त्यावर व्यापाèऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या. मात्र फेरीवाले, भाजी, फळ विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी या अ‍ॅन्टीजेन टेस्टकडे पाठ फिरवली आहे.

    यवतमाळ.  कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हाधिकाèऱ्यांनी  कठोर आदेश देत व्यापाऱ्यांना अ‍ॅँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक केले. मात्र, यवतमाळ शहरासह तालुक्यातील फेरीवाले, हॉटेल व्यावसायिक व भाजी, फळ विक्रेत्यांनी अँटिजेन टेस्टकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले असून आत्तापर्यंत एकही कारवाई केली नाही.

    यवतमाळ शहरात मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाèऱ्यांनी नागरिकांच्या जास्त संपर्कात असणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक केली होती.

    सुरूवातीस व्यापाऱ्यांनी या टेस्टकडे पाठ फिरविली होती़ परंतु, प्रशासनाने अ‍ॅन्टीजेन टेस्ट करा, अन्यथा दुकाने उघडू देणार नाही, अशी सक्त ताकीद दिली. त्यावर व्यापाèऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या. मात्र फेरीवाले, भाजी, फळ विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी या अ‍ॅन्टीजेन टेस्टकडे पाठ फिरवली आहे. हे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यांचे व्यवसाय हे मुख्य रस्त्यावरच आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर या चुकीची किंमत नागरिकांनाच मोजावी लागेल. कोणी टेस्ट केली की नाही हे पाहण्यासाठी नगरपालिकेने वेगवेगळ्या पथकांची नेमणूक केली. मात्र, शहरातील 25 ते 30 टक्के व्यापाèऱ्यांनी अँटिजन टेस्ट केलेल्या नसताना या पथकाकडून आठ दिवसांत एकही कारवाई करण्यात आली नसल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात येत आहे.