पावसात ताडपत्री बांधत होता; अचानक अंगावर वीज कोसळली

पावसाने मराठवाडा आणि विदर्भामध्ये रौद्ररूप धारण केले आहे. अनेकांची जनावरं या पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली आहेत. अशी एक ना अनेक पाण्याची संकट असतानाच आता पावसासोबत वीजा देखील कोसळू लागल्या आहेत.

    यवतमाळ (Yavatmal) : गुलाब चक्री वादळामुळे Rose Cyclone वादळ वाऱ्यासह मोठ्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस Heavy Rain सुरु आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पावसाने मराठवाडा आणि विदर्भामध्ये (Marathwada and Vidarbha) रौद्ररूप धारण केले आहे अनेक ठिकाणी लोकं अडकून पडलेत तर अनेकांची जनावरं या पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली आहेत. अशी एक ना अनेक पाण्याची संकट असतनाच आता पावसासोबत वीजा देखील कोसळू लागल्या आहेत.

    वादळ वाऱ्याच्या पावसासोबत वीज पडल्याचा प्रकार आज यवतमाळ Yavatmal मध्ये घडला आहे. आर्णी तालुक्यातील महाळूंगी Mahalungi येथे घरावर ताडपत्री बाधंत असताना अचानक वीज पडल्याने यात विनोद प्रेमसिंग राठोड Vinod Premsingh Rathod यांचा जागीच मृत्यू झाला आहे या दुर्दैवी घटनेमुळे आधीच पावसाने बेजार झालेल्या यवतमाळच्या नागरिकांमध्ये भितीच वातावरण निर्माण झालं आहे.