मुसळधार पावसात ST बस पुलावरुन थेट पाण्यात कोसळली, मदतीसाठी धडपड सुरू

मुसळधार पावसात एसटी बस थेट पाण्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटीच्या हिरकणी बसला अपघात झाला आहे. बस थेट पाण्यात कोसळली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरापासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    यवतमाळ : मुसळधार पावसात एसटी बस थेट पाण्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटीच्या हिरकणी बसला अपघात झाला आहे. बस थेट पाण्यात कोसळली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरापासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    दरम्यान नदीवरुन पाणी वाहत असताना एसटी बस चालकाने नको ते धाडस करत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. या पुलावरुन पाणी वाहून जात असतानाही चालकाने त्या पाण्यातून गाडी नेली आणि पाण्याच्या प्रवाहात ही बस वाहून गेली.

    घटनास्थळी मोठ्या वेगाने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. नद्या ओसंडून वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत. राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, 7 जिल्ह्यांना रेड तर 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

    राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 10 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट पालघर ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक धुळे जळगाव या 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मुंबई सिंधुदुर्ग नंदुरबार पुणे अहमदनगर औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.