
तालुक्यातील खंडाळा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जवळा येथील दोन सख्ख्या भावांचा दुचाकीची झाडाला धडक लागून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २२) मध्यरात्री सावरगाव (गोरे) परिसरात घडली.
पुसद (Pusad) : तालुक्यातील खंडाळा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जवळा येथील दोन सख्ख्या भावांचा दुचाकीची झाडाला धडक लागून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २२) मध्यरात्री सावरगाव (गोरे) परिसरात घडली. भगवान यादव भालेराव (वय ३०) व गजानन यादव भालेराव (वय २२) दोघे रा. जवळा अशी मृतांची नावे आहेत. चुलतभाऊ आदित्य दादाराव भालेराव (वय १५, रा. जवळा) हा गंभीर जखमी असून, त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याच्यावर पुसद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, जवळा येथील हे तिघे जण खंडाळा पोलिस ठाण्याला फिर्याद देण्यासाठी जात होते. मृत भगवान यादव भालेराव याच्या पत्नीच्या बहिणीची गावातील मुलांनी छेड काढली होती. त्याची तक्रार देण्यासाठी खंडाळ्याला दुचाकीने निघाले होते. मात्र, रात्रीच्या अंधारात दुचाकीने जात असताना झाडाला धडक लागली. त्यात दोघे ठार झाले.