रस्ता रुंदीकरणात सापडला प्राचीन संस्कृतीचा खजिना; पूर्वी साम्राज्य असल्याची पटली ओळख

झरी तालुक्यातील (Zari taluka) शिबला ते पांढरकवडा (Shibla to Pandharkavada) या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तालुक्यातील पार्डी गावाजवळील वळण रस्त्यावर खोदकाम करीत असताना प्राचीन काळातील दगडी खांब (An ancient stone pillar) आढळून आले.

    यवतमाळ (Yavatmal). झरी तालुक्यातील (Zari taluka) शिबला ते पांढरकवडा (Shibla to Pandharkavada) या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तालुक्यातील पार्डी गावाजवळील वळण रस्त्यावर खोदकाम करीत असताना प्राचीन काळातील दगडी खांब (An ancient stone pillar) आढळून आले. यावरून याठिकाणी पुरातन काळात एखादे साम्राज्य (an empire) असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

    झरी तालुक्यात अनेक रहस्यमय बाबी आहेत. हा भाग मागासलेला असला तरी तालुक्यात आजही अनेक रहस्यमय बाबी आहेत. तालुक्यातील खापरी शेखापूर जंगलातही वेगवेगळ्या आकारांचे दगड आढळून आले आहेत. पूर्वी तेथे गाव असल्याच्या खुणा आढळतात. या दगडी खांबांमुळे पुरातत्व विभागाला संशोधनाची संधी प्राप्त झाली आहे. कायर भागातही खोदकामात अनेक प्राचीन अवशेष सापडले असून कायर, जुनी मांगली, भुडकेश्वर येथे प्राचीन मंदिरे आहेत. ही मंदिरे त्या काळच्या राजाने निर्माण केलेली आहेत.

    काळाच्या ओघात अनेक उलथापालथी होऊन वास्तू दडल्या जातात. मात्र, काही पुरावे सोडून जातात. माथार्जुन येथेही फार पूर्वी सती प्रथा होती, असे काही ज्येष्ठ नागरिक सांगतात. सतीच्या समाधीचे काही दगड याठिकाणी आहेत. या भागाकडे दुर्लक्ष झाले असले तरी मानवी इतिहास हा फार जुना आहे. भूकंप, नैसर्गिक संकटे यात अनेक प्राचीन वैभव नाहीसे झालेले आहे. या दगडामुळे इतिहासकारांना संशोधनासाठी एक नवा विषय मिळाला आहे. दरम्यान, रस्त्यावर पुरातन काळातील असे दगडी खांब आढळून आल्याने परिसरात मात्र हा कुतूहलाचा विषय बनला आहे.