शिवसेना आमदाराचा धाक दाखवून महिलेने लुबाडले ०७ लाख; नगर परिषद कर्मचाऱ्याची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी अनिल यांनी काकू व आईशी संपर्क साधून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते. दोघींनी त्यांना समजावले. तरीही त्यांनी निर्णय बदलला नाही.

    यवतमाळ (Yavatmal) : शिवसेनेच्या (Shivsena) दिग्रस (Digras) उपशहर प्रमुख असलेल्या महिलेच्या ब्लॅकमेलिंगला (blackmailing) कंटाळून एका नगर परिषद कर्मचाऱ्याने (A city council employee) आत्महत्या (suicide) केली. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या कर्मचाऱ्याने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ (a video before committing suicide) तयार करून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे.

    अनिल अशोक उबाळे, असे आत्महत्याग्रस्त नगर परिषद कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या व्हिडीओत शिवसेनेच्या दिग्रस उपशहर प्रमुख असलेली महिला आमदार संजय राठोड यांचा धाक दाखवून सात वर्षांपासून पैसे उकळत होती. अलीकडे तिने पाच लाखांची मागणी केली. तितकी रक्कम नसल्याने दोन लाख रुपये जमा केले. तीन लाख रुपये देणे शक्य नसल्याचे सांगितले. तरीही छळ थांबला नाही. त्यामुळे आपल्याला आत्महत्या करावी लागत आहे. यानंतर मित्र, नातेवाइकांना न्याय मिळवून द्यावा, असेही त्यांनी व्हिडीओत म्हटले आहे.

    आत्महत्येपूर्वी अनिल यांनी काकू व आईशी संपर्क साधून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते. दोघींनी त्यांना समजावले. तरीही त्यांनी निर्णय बदलला नाही. या घटनेवरून संतप्त झालेल्या अनिल यांच्या नातेवाइकांनी दिग्रस पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सदर महिलेला अटक करण्याची मागणी केली आहे.