दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; पाच जणांसह विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक

दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.वसीम पठाण दिलावर पठाण (वय ३६ , रा. नेताजी नगर),उमेश तुळशीराम येरमे (वय३४ , रा. नेताजीनगर), अशी मृतांची नावे आहेत.

    यवतमाळ: जुन्या भांडणाच्या कारणातून वाद करीत धारदार शस्त्राने हल्ला करून दोघांचा खून करण्यात आला. ही घटना आर्णी मार्गावरील पल्लवी लॉनसमोर घडली. दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.वसीम पठाण दिलावर पठाण (वय ३६ , रा. नेताजी नगर),उमेश तुळशीराम येरमे (वय३४ , रा. नेताजीनगर), अशी मृतांची नावे आहेत.

    मृताची पत्नी निखत वसीम पठाण हिने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने अवघ्या सहा तासात पाच जणांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली. छोटू अनवर खा पठाण, निरज वाघमारे, अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार शेख, नितीन पवार, नीलेश उईके अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.