Yavatmal: ST driver's daring to die; Extreme levels of flood danger were announced in at least four places

एसटीचालकाने नको ते धाडस करत बस थेट पुराच्या पाण्यातून रेटली आणि दुर्दैवाने थेट नाल्यात कोसळली(Yavatmal ST Bus Driver Stunt). यामध्ये एसटी चालक, वाहकासह चौघांना जलसमाधी मिळाली, तर तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. ही घटना मंगळवारी सकाळी 8 वाजता पुसद-उमरखेड मार्गावरील दहागाव येथे घडली. ही बस उमरखेडहून नागपूरकडे जात होती.

  यवतमाळ : एसटीचालकाने नको ते धाडस करत बस थेट पुराच्या पाण्यातून रेटली आणि दुर्दैवाने थेट नाल्यात कोसळली(Yavatmal ST Bus Driver Stunt). यामध्ये एसटी चालक, वाहकासह चौघांना जलसमाधी मिळाली, तर तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. ही घटना मंगळवारी सकाळी 8 वाजता पुसद-उमरखेड मार्गावरील दहागाव येथे घडली. ही बस उमरखेडहून नागपूरकडे जात होती.

  सुरेश रंगप्पा सुरेवार (54) चालक, भीमराव लक्ष्मण नागरिकर ( 52) वाहक, सलीम शे इब्राहीम (50) रा. पुसद व अन्य एक, अशी मृतांची नावे आहेत. तर शरद नामदेव फूलमाली (27), राजा सूर्या वेंकटा सुब्रमण्यम (48) असे बसमधून बचाव करण्यात आलेल्या जखमी प्रवाशांची नावे आहेत.

  सतर्क करूनही चालकाने केले दुर्लक्ष

  गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस असल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. मंगळवारी सकाळी नागपूर आगाराची हिरकणी बस क्रमांक एमएच 14 बी.टी.5018 ही बस उमरखेड येथून नागपूरकडे निघाली होती. उमरखेड-पुसद मार्गावर दहेगाव नाल्यावर मोठा पूल असून दोन दिवसांपासून या पुलावरून पाणी वाहत आहे. असे असतानाही बसचालकाने नाल्यावरून बस काढण्याचा प्रयत्न करताच परिसरातील नागरिकांनी बसला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने दुर्लक्ष केले. पूलाचा अंदाज न आल्यामुळे बस थेट पाण्यात कोसळली. व काही अंतरावर जाऊन एका झाडाला अडकली.

  दोघे झाडावर, दोघे टपावर

  घटनेनंतर स्थानिक नागरिक व तालुका बचाव पथकाच्या सहाय्याने प्रवाशांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यातील दोन प्रवासी झाडावर चढलेले होते. व दोन एसटी बसच्या टपावर होते. त्यांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आले. मात्र एसटी मध्ये अडकून पडल्याने वाहक, चालकांसह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला.