corruption

मिळालेल्या माहितीनूसार, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायतीमधला हा व्हिडीओ असून, ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे डोनगाव ग्रामपंचायतीत नवख्या असलेल्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे धडे शिकवतानाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

    बुलडाणा – जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत एक ग्रामसेवक आपल्या सरपंच आणि इतर सदस्यांना चक्क भ्रष्टाचाराचे धडे देत असल्याची घटना समोर आली आहे. ही सगळी भ्रष्टाचाराची शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

    मिळालेल्या माहितीनूसार, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायतीमधला हा व्हिडीओ असून, ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे डोनगाव ग्रामपंचायतीत नवख्या असलेल्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे धडे शिकवतानाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. यात ग्रामपंचायत सचिव ज्ञानेश्वर चनखोरे, महिला सरपंच रेखा पांडव, महिला सरपंचाचा पती रवी पांडव, ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश घोगल व प्रदीप परमाळे असे सर्व ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बसलेले असतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे.

    सदरील व्हिडिओत ग्राम सचिव हा महिला सरपंचाला म्हणतो की, “पावसाळा लागला की जनतेच्या प्रश्नावर आपण कान आणि डोळे बंद करून घ्यायचे आणि जसे जळत तसे जळू द्यायचे कारण जनता बदमाश आहे. शिवाय तुम्हाला जनतेने पैसे घेऊनच मतदान केले आहे. एकाही चोराने फुकट मतदान केले नाही. मतदान करणारे चोर आहेत. आपण इथे पैसे खाण्यासाठी बसलो असून पैसे खाणे हा आपला अधिकार आहे.” हे संभाषण सीसीटीव्हीत कैद करण्यात आला आहे.