
भाजपातील पंकजा यांच्या नाराजीवरुनच आता महाराष्ट्र काँग्रेसनं भाजपावर तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टिका केली आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसनं एक व्हीडिओ शेअर करत लिहिले की, "शेवटी काय भाजपाचे संस्कार म्हटल्यावर असंच होणार!"
मुंबई- मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या (BJP) महिला नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मुंडे भगिनीना डावलले जात असल्याची देखील चर्चा आहे. खासकरुन पंकजा मुंडे यांची विधान परिषद आमदारकीसाठी वर्णी लागण्याची शक्यता होती, मात्र शेवटच्या क्षणी पक्षश्रेष्ठींनी आणि राज्यातील “मोजक्या” नेत्यांनी त्यांचे तिकीट कापले, तेव्हापासून पंकजा मुंडे ह्या पक्षापासून दुरावला गेल्या असल्याचं चित्र आहे. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपातील अनेक कार्यक्रमात दिसल्याच नाहीत. तसेच त्यांनी भगवान गडावर उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर जे पी नड्डा यांच्या मराठवाड्यातील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे निमंत्रण पत्रिकेवर नावच नव्हते, त्यामुळं पक्षाने देखील पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असं बोललं जात आहे. मात्र या कार्यक्रमात मुंडे भगिनाना निमंत्रण नसल्यामुळं मुंडे समर्थक नाराज झाले आहेत, पंकजा मुंडेंना डावलले जाते का? अशी चर्चां सुरु आहे.
जे स्वतःच्या पक्षातीलच एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलून देत नसतील ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील याचा विचार न केलेलाच बरा.
शेवटी काय भाजपचे संस्कार म्हंटल्यावर असच होणार! pic.twitter.com/GIyQZJDRAe
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 21, 2023
काय म्हटलंय ट्विटमध्ये?
दरम्यान, भाजपातील पंकजा यांच्या नाराजीवरुनच आता महाराष्ट्र काँग्रेसनं भाजपावर तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टिका केली आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसनं एक व्हीडिओ शेअर करत लिहिले की, “शेवटी काय भाजपाचे संस्कार म्हटल्यावर असंच होणार!”, “जे स्वतःच्या पक्षातीलच एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलून देत नसतील ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील याचा विचार न केलेलाच बरा. शेवटी काय भाजपाचे संस्कार म्हटल्यावर असंच होणार!” असं म्हणत काँग्रेसने भाजपावर निशाणा हल्लाबोल केला आहे.
पंकजांना बोलूच दिले नाही…
या व्हीडिओत पंकजा मुंडेंना बोलायचे होते. त्यापूर्वी बावनकुळेंनी कोडियमचा ताबा घेतला. त्यानंतर पंकजा त्यांना बोलल्या की, मी आधी बोलते… मला बोलायचे आहे…फक्त दोन मिनिटे बोते…मात्र नाही…नाही असं उत्तर बावनकुळेंनी दिले. त्यानंतर पंकजा ह्या निमूटपणे परत जाऊन खुर्चीवर बसल्या, अशा प्रकरचा व्हीडिओ महाराष्ट्र काँग्रेसनं शेअर केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
दरम्यान, याबाबत बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही पंकजा मुंडे ह्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या असल्याचं म्हटलं. मात्र, गेवराई येथील कार्यक्रमात पंकजा मुंडेंच्या अगोदर भाषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पंकजा मुंडेंच्या नाराजीबद्दल अफवा पसरवणारा एक गट भाजपातच आहे, असेही त्यांनी म्हटले. यावरुन आता काँग्रेसने भाजपा तसेच बावनकुळेंवर टिका केली आहे. दरम्यान, यावर पंकजा मुंडे या काय बोलणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.