vidhan parishad

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवार, 20 रोजी होणाऱ्या निवडणुकीत देशाचे लक्ष लागून आहे. राज्यसभेतील भाजपाचा वरचढपणा लक्षात आल्याने महाविकास आघाडी यावेळी कमालीची सतर्क आहे. हॉटेलातील आमदारांचे पंचतारांकित मुक्काम, मतदानाचे प्रशिक्षण आणि मते वळविण्याचा नाद सर्वच पक्षांना आज लागला. सोमवारी सकाळी 9 वाजता मतदानास सुरुवात होईल(Vidhan Parishad Election 2022).

  मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवार, 20 रोजी होणाऱ्या निवडणुकीत देशाचे लक्ष लागून आहे. राज्यसभेतील भाजपाचा वरचढपणा लक्षात आल्याने महाविकास आघाडी यावेळी कमालीची सतर्क आहे. हॉटेलातील आमदारांचे पंचतारांकित मुक्काम, मतदानाचे प्रशिक्षण आणि मते वळविण्याचा नाद सर्वच पक्षांना आज लागला. सोमवारी सकाळी 9 वाजता मतदानास सुरुवात होईल(Vidhan Parishad Election 2022).

  285 आमदार भाग घेतील. शिवेसनेची एक जागा रिक्त आहे तर, राष्ट्रवादीच्या नबाब मलिक व अनिल देशमुख या दोन सदस्यांचा मुक्काम तुरुंगात आहे. मलिक व देशमुखांसाठी महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोकत आहे. त्यामुळे ही दोन मते अधांतरी आहेत.

  एमआयमएमची दोन, बहुजन विकास आघाडीची तीन आणि समाजवादी पार्टीची दोन अशी सात मते कोणाच्या पारड्यात पडतील यावरच महाराष्ट्राच्या सत्तेचेही बळ लक्षात येते. राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी हितेंद्र ठाकूर यांची तर एमआयएमचे धुळे शहर मतदारसंघातील आमदार फारूख अन्वर शेख यांनी ओबेरॉय ट्रायडंट हॉटेलमध्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

  पहिल्या पसंतीचे मत खडसेंना देऊ तथापि, दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे मत कोणाला द्यायचे हे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी ठरविणार असल्याची माहिती शेख यांनी दिली. एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत आहेत.

  निवडणुकीत एकही मत फुटू नये म्हणून महाविकास आघाडीचे नेते जागरुकतेने काम करत असून रविवारी सायंकाळी ट्रायडंटमध्ये बैठकींचा सिलसिला सुरु होता. अशोक चव्हाण, सुनील केदार, बाळासाहेब थोरात व सतेज पाटील या नेत्यांनी अजित पवारांसोबत खलबतं केली.

  भाई जगताप यांच्यासाठी काँग्रेस नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते होती. विधान परिषद निवडणूकीत या दोन्ही पक्षांकडे अतिरिक्त मते शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते आपापल्या उमेदवारांना द्यावी लागतील. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 26 मतांची आवश्यक्ता भासेल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष 26 मतांचे गणित जुळवण्याच्या कामाला लागले आहेत.

  पाचवी जागा जिकरीची, काँग्रेसचीही कसरत

  आमदार व अपक्षांचे संख्याबळ लक्षात घेतले तर भाजपाला पाचवा उमेदवार निवडणून आणणे कठीण दिसत आहे. तर काँग्रेसचा दुसऱ्या जागेवरचा उमेदवार निवडणून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवसेना आमदार व अपक्ष मिळून शिवसेनेकडे 62 मते आहेत. राष्ट्रवादीचे आमदार व अपक्षाची 4 मते मिळून राष्ट्रवादीची स्वतःची 55 मते आहेत. काँग्रेसची स्वतःची 44 मते आहे. त्यांच्याकडे अपक्ष आमदार नाहीत. दोन जागा निवडणून आणण्यासाठी काँग्रेसला 8 मतांची गरज आहे. भाजपाची स्वतःची 44 मते 6 अपक्ष मिळून 112 आमदारांचे संख्याबळ आहे. पाचवी जागा निवडून आणण्यासाठी भाजपाला 130 मते आवश्यक आहेत.