पेनटाकळी धरणाचा जलसाठा वाढल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

रिसोड तालुक्याला लागूनच मेहकर तालुका असल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीतून मोठ्या प्रमाणात होते. पाणी नदीपात्राच्या बाहेर जाऊन नदीकाठावरील गावातील जनजीवन प्रभावित होऊ शकते म्हणून प्रशासनाने ८ ऑगस्टला पत्रक काढून रिसोड तहसीलदार यांना अवगत केले आहे.

    रिसोड : रिसोड तालुक्यालगत (Risod Taluka) पैनगंगा नदीवर (Panganga River) बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात (Mehkar Taluka of Buldhana District) असलेले पेनटाकळी धरण (Pentakali Dam) ८ ऑगस्टपर्यंत जवळपास ८१ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा (Vigilance warning administration) देण्यात आला आहे.

    रिसोड तालुक्याला लागूनच मेहकर तालुका असल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीतून मोठ्या प्रमाणात होते. पाणी नदीपात्राच्या बाहेर जाऊन नदीकाठावरील गावातील जनजीवन प्रभावित होऊ शकते म्हणून प्रशासनाने ८ ऑगस्टला पत्रक काढून रिसोड तहसीलदार यांना अवगत केले आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी वा मालमत्तेची हानी (Loss of life or property damage) होऊ नये, यासाठी चलमालमत्ता, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी, शेती संबंधित अवजारे व इतर साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलविण्यासंबंधित गावकऱ्यांना सूचित करण्याच्या व सावधगिरी बाळगण्याच्या सूचना तहसीलदार अजित शेलार (Notice Tehsildar Ajit Shelar) यांच्याकडून प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.