
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सेटलमेंट केले होती, असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळं एक नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पुणे- शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन आता पाच महिने पूर्ण होत आहे. मात्र अजूनही शिंदे गटाचे बंड आणि हे सरकार कसे अस्तित्वात आले, यावर चर्चा होताना पाहयला मिळत आहे. दरम्यान राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येत आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. या गौप्यस्फोटामुळं शिवतारे चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सेटलमेंट केले होती, असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळं एक नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
2019 साली निवडणुकीनंतर केवळ मविआची औपचारिक घोषणा झाली. मात्र निवडणूक कशी लढवायची हे आधीच ठरले होते. महाविकास आघाडी तसार करण्याआधीच सर्व काही ठरले होते. कोणत्या जागावरील उमेदवार पाडायचे, कोणत्या उमेदवारांना विजयी करायचे हे सर्व आधीच ठरले होते. आता ही लोकं केवळ सर्वांना फसवत आहेत, असा दावा विजय शिवतारेंनी केला आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते, यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे, त्यामुळं यावर महाविकास आघाडीकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहवे लागणार आहे.
पुढे बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, बहुमताचे आकडे कसे जुळवून आणायचे हा कट निवडणुकी आधी ठरला होता, राज्यात मविआचे सरकार आले तेव्हा हे सरकार जनतेच्या हिताचे नाही असे सर्वांत पहिले मी सांगितले. तसेच एकनाथ शिंदेंसोबत एक तासभर चर्चा केली. तुम्ही उद्धव ठाकरेंवर प्रेशर टाका आणि ही आघाडी तोडायला लावा, असं सांगितले. तसेच शिंदेंच्या डोक्यात या उठावाची बिजे आपणच पेरली असा दावा विजय शिवतारे यांनी केला. त्यानंतर राज्यात काय घडले हे सर्वांनाच माहित आहे, असं शिवतारे म्हणाले. पण शिवतारेंच्या नव्या गौप्यस्फोटामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.