महायुती सरकारकडे जनतेच्या विकासाचा प्लॅन नाही, तर आमदारांच्या विकासाचा प्लॅन आहे – विजय वडेट्टीवार

ओबीसी समाजाला ज्याची साथ त्याला साथ ओबीसी देईल, हा ओबीसी समाजाचा प्रयत्न आहे

    विजय वडेट्टीवार : आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये विजय वडेट्टीवार २०१४ मध्ये त्यावेळच्या सरकारने ४९८०० कोटीचे बजेट दिलं होतं, त्या पॅकेजचं काय झालं. त्याच सरकारने उत्तर द्यावे आणि नव्याने काय ते सांगावे. आत्महत्याग्रस्त मराठवाडा आत्महत्या मुक्तीच्या घोषणेचे काय झालं, मराठवड्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या आहे, त्यावर अधिकृत माहिती होणार आहे, नव्याने पॅकेज निवडणुका पाहून लोकांची फसवणूक करू नका, जुन्या काडीला नव्याने ऊत असं होऊ नये, जनता माफ करणार नाही असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

    पुढे ते म्हणाले, ३५ संवर्गासाठी जीआर होता, ही बनवाबनवी आहे. अजित दादा ने फसवणूक करू नये, नव्याने जीआर काढताना विरोध दर्शविला होता. आता काय पुळका आला की कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला. कॉर्पोरेशनमध्ये पद भरण्याचा समावेश आहे. दिशाभूल करणारे वक्तव्य करू नये. सरकार ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारे.. शासकीय योजनेचा फायदा घेत आहे. सरकार म्हणते तर आता अपनों को खिलाउंगा असा सरकारचा नारा आहे. गुप्त मध्ये जाय समझौता केला, ओबीसीत आरक्षणासाठी काही झाल तर सोडणार नाही. ओबीसीच्या संदर्भात मुख्यमंत्री यांची वेळ मागितली आहे, आम्ही राज्यातील नेत्यांना घेऊन भेटायला जाणार आहोत असे त्यांनी सांगितले.

    कदाचित आघाडी बैठक नागपुरात होणार आहे. लवकरात लवकर जागावाटपांचा प्रश्न सुटावा यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे. त्या त्या ठिकाणाहून कामाला सुरुवात करता यावी अशी भूमिका आहे. समाजात भेदभाव दिसू नये, आमचा ओबीसींचा कार्यकर्ता उपाशी आहे, सहा महिन्याचं बाळ आहे त्याला, यासाठी उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यांनी जावे, अशी विनंती केली आहे. ओबीसी समाजाला ज्याची साथ त्याला साथ ओबीसी देईल, हा ओबीसी समाजाचा प्रयत्न आहे, रोहिणी आयोगातून तेल टाकण्याचा प्रयत्न होईल, केंद्र सरकारचे उपद्रवी प्रयत्न आहेत. दोन गट पडले हे स्पष्ट झाले आहे, अस्तित्वाची लढाई असल्याने शरद पवार साहेबांसमोरून अजित पवार जात नाही. मागून जातात. गिल्टीपणा त्यांच्या चेहऱ्यावर आणि वागण्यातून दिसून येत आहे. अजित दादा आमदारांची जबाबदारी त्यांच्यावर आहे फडणवीसांची फडणवीसांवर आणि शिंदेंच्या आमदारांची शिंदेंवर असल्याने विकासाच्या नावावर तिजोरी ओरबडत आहेत. हे डाकू आणि लुटेरे आहेत, ज्यांना तिजोरी साफ कऱायची आहे. जनतेच्या विकासाचा प्लॅन नाहीतर आमदारांच्या विकासाचा प्लॅन आहे असे विजय वडेट्टीवार म्हणाले.