हे घोटाळेबाज सरकार आहे, त्या नऊ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून बाहेर काढावेच लागेल – विजय वडेट्टीवार

तकऱ्यांना फसवणाऱ्या हसन मुश्रीफ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी विजय वडेट्टीवार यांची मागणी आहे.

    विजय वडेट्टीवार : आज विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले विदर्भाच्या या सुपुत्राने मानाचा तुरा रोवलाय. हे अभिमानास्पद आहे. त्याचे अभिनंदन आणि शुभेच्छा. पुढील काही १५ दिवसांत मंत्रिमंडळातील ९ मंत्र्यांना काढावे लागेल, राजीनामा घ्यावा लागेल. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांचे नाव आता सांगू शकत नाही. मंत्रिमंडळ फेर रचनेनंतर हे मंत्री दिसणार नाही. हे घोटाळेबाज सरकार आहे. सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही जनतेसमोर आणू. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या हसन मुश्रीफ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी विजय वडेट्टीवार यांची मागणी आहे.

    पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले, इंडिया आघाडीसंदर्भात दिल्लीत अतिशय सकारात्मक बैठक होती. जागा वाटपाबाबत आम्ही पुढे जातोय. १६ आमदारांवर कारवाई होणारच. त्यामुळेच उशीर होतोय. वेळकाढूपणा होतोय. भ्रष्टाचारी ९ मंत्र्यांना काढावेच लागेल. भ्रष्टाचारी मंत्र्यांना बाहेर काढल्याशिवाय पर्यायच नाही. त्यांच्याबाबत भाजपच्याच नेत्यांनी तक्रारी अगोदरच केल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

    पुढे ते म्हणाले, नांदेड रुग्णालयाचा दोष नाहीच, सरकारचा दोष आहे. त्या नालायक मंत्र्यांनी निधीच दिला नाही. दोष सरकारचा आहे. सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण या दोन्ही खात्यांची जबाबदारी आहे, ती झटकून चालणार नाही. बावनकुळे कधी शिंदे, कधी पवार कधी फडणवीस यांचे मु्ख्यमंत्री म्हणून नाव घेतात, त्यांना सगळ्यांनाच खूश ठेवायचे आहे. हा दबावाचा खेळ असून, तो राजकीय आजार होता असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.