राज्यात मास्कसक्ती होणार का ? विजय वडेट्टीवारांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (Corona Patients In Maharashtra) संख्या झपाट्याने वाढत आहे. आठ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात १ हजार ४९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

    मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Patients) रोज वाढत आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या (Corona) जर अशीच वाढली तर मास्क सक्तीचा (Mask Compulsion) आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं.

    राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (Corona Patients In Maharashtra) संख्या झपाट्याने वाढत आहे. आठ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात १ हजार ४९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात १३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

    कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शाळा सुरु करण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री यांनी मात्र १५ जूनपासून शाळा सुरु होणार असल्याचं स्पष्ट केलं. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, “शाळा सुरु करण्याबाबत मात्र आता तरी थांबता येणार नाही. गेली दोन वर्षे शैक्षणिक नुकसानाने एक पिढी बरबाद झाली आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत जी परिस्थिती असेल ती बघून निर्णय घेता येईल.”

    दरम्यान आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीवर चर्चा जरुर होईल, मात्र निर्बंधांबाबतचा विषय सध्या तरी अजेंडावर नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. परंतु नागरिकांनी मास्क घालावेत. ही स्वयंशिस्त लोकांनीच पाळावी, असं आवाहनही त्यांनी केलं.