आंदोलन चिरडण्याचा महापाप कुणी केले : विलासराव जगताप; जत तालुका सकल मराठा संघटनेचा रास्ता रोको

    जत : जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता आणि संयमाने मोर्चा काढून आंदोलन करत असताना या आंदोलनकर्त्यावर गोळीबार करून आंदोलन चिरडण्याचा महापाप कुणी केले त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली.
    या आंदोलनाला जत शहर व्यापारी वर्गाने आपले सर्व व्यवहार काही काळ बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक प्रकाशराव जमदाडे, सकल मराठा संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष अँड. रणधीर कदम, अमर जाधव, अनिल शिंदे, यांची भाषणे झाली. आभार तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत यांनी मानले या मोर्चा आणि या आंदोलनाला जत तालुका सराफ संघटनेचे सुभाष पाटील, महेश सावंत, अजिंक्य (बाळ) सावंत, राहुल जाधव, गणपतराव कोडग, अरुण शिंदे, गणेश सावंत, प्रकाश माने, विशाल साबळे, राहुल मोरे, इत्यादी सह अन्य कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग दाखवला.

    शासनास जाग आणण्यासाठी आंदोलन
    जगताप म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शासनास जाग आणण्यासाठी आंदोलन सुरू असताना लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला याची चौकशी करावी, अशी मागणी जगताप यांनी यावेळी केली जत तालुका सकल मराठा संघटनेच्या वतीने महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.