चिकन ताट देण्यास उशीर झाला म्हणून दाखवले गावठी पिस्तूल ; अकलूज पोलिसात गुन्हा दाखल

हॉटेलत जेवण देण्यास उशीर केला म्हणून गावठी पिस्तूल दाखवण्याचे थरार नाट्य अकलुजमध्ये घडले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.  ही घटना शुक्रवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकलूज पोलीस‌ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला माळशिरस न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

    अकलूज : हॉटेलत जेवण देण्यास उशीर केला म्हणून गावठी पिस्तूल दाखवण्याचे थरार नाट्य अकलुजमध्ये घडले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.  ही घटना शुक्रवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकलूज पोलीस‌ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला माळशिरस न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

    पोलिसातुन मिळालेली अधिक माहिती अशी, येथील गुपचूप हॉटेलात शुक्रवार दि. २९ डिसेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास शंकर खंदारे हा त्याचा मित्र करण भोसले याच्यासह हॉटेलमध्ये आला होता. त्याने दोन चिकन थाळीची ऑर्डर दिली होती. गर्दी असल्याने त्यांची अॉडर्र येण्यास वेळ झाला. त्यामुळे त्याने तुम्ही हॉटेल चालवता का काय करता? आमची ऑर्डर लवकर आणा असे म्हणत शिवीगाळ करुन गोंधळ घातला. यावेळी चालकाने हॉटेलमध्ये आज गर्दी असल्याने थोडा वेळ लागेल, तुम्हाला खूपच गडबड असेल तर तुम्ही दुसरीकडे जावा. विनाकारण कामगारांना शिवीगाळ करू नका. तसेच इतरांना त्रास होत आहे असे समजावून सांगितले.

    मात्र शंकर खंदारे याने ‘तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे, मी काय करू शकतो तुमच्याकडे बघतोच’ अशी धमकी देत मित्रासह तो निघून गेला. खंदारे व करण भोसले हे पुन्हा आले व हॉटेल मालक व वेटर लोकांना तुमच्याकडे बघतो म्हणून दमदाटी करु लागले. यावर शंकर खंदारे याने शिविगाळ करत मॅनेजर मनोज घाडगे याला गावठी पिस्टल दाखविले. ्दरम्यना घाडगे यांनी पिस्टल काढून घेतली व पोलिसांना याची माहिती दिली.

    पोलिसांनी शंकर सुधाकर खंदारे (रा. महषर्ी कॉलनी, अकलुज, ता. माळशिरस) याला त्ााब्यात घेतले. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचे एक जुनाट गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल (रिव्हॉल्वर) जप्त केले. याबाबत हॉटेलचे चालक काकासाहेब जगदाळे यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिली आहे.