विकासाच्या मुद्द्यावर विनायक राऊत यांनी खुलेआम डबलबारी करावी – प्रमोद जठार

उध्दव ठाकरे यांच्या धनदांडग्या नातेवाईकांनी नाणार परिसरातील जागा घेतल्या.हे विनायक राऊत यांनी जाहीर सभेत सांगितले होते. त्यांनी उदाहरणे देवून कबुली दिली.

  कणकवली : कणकवलीत काल पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये प्रमोद जठार बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, विनायक राऊतांनी मागील 10 वर्षांत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेली 10 विकासात्मक कामे आम्हाला दाखवावीत. विकासाच्या मुद्यावर राऊत यांनी माझ्याशी खुलेआम डबलबारी करावी, असे आव्हान माजी आमदार तथा भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अन्य महापुरुष ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही तर जनतेची प्रॉपर्टी आहे, असा टोला जठार यांनी ठाकरेंना लगावला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे प्रगतीच्या दिशेने जाणारे व्यक्तिमत्व आहे आणि ठाकरे – राऊत हे अधोगतीच्या दिशेने जाणारी व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे जनतेने प्रगतीकडे जायचे की अधोगतीकडे जायचे याचा निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.

  प्रमोद जठार म्हणाले, कणकवलीतील जाहीर सभेत महाराष्ट्रातील प्रकल्प भाजपने गुजरातला पळवले, असा आरोप उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांचा आरोप होता. ठाकरे आणि राऊतांचा हा आरोप बिनबुडाचा आहे. गुजरातमध्ये खासगी रिफायनरी प्रकल्प झाल्यामुळे तेथील बेरोजगारांना रोजगार मिळून अंबानी आणि सरकार श्रीमंत झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे रिफायनरी प्रकल्प झाला असता तर कोकणातील 2 लाख बेरोजगारांना रोजगार मिळला असता आणि नाणारमधील लोक श्रीमंत झाले असते. मात्र, राऊतांनी उद्धव ठाकरे यांना या प्रकल्पाबाबत चुकीची माहिती देत प्रकल्पास विरोध करण्यास भाग पाडले. आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासह सेनेच्या स्थानिक पदाधिकारी यांचा रिफायनरी प्रकल्पास समर्थन आहे. केवळ राऊत यांचा या प्रकल्पास विरोध असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले. वेंगुर्ले येथील पाणबुडीचा प्रकल्प हा केवळ 50 कोटीचा आहे आणि समुद्रात कोठेही हा पर्यटन प्रकल्प घेता येतो. त्यामुळे त्यांचा हा आरोप खोटा असून सदर प्रकल्प काही तांत्रिक अचडणींमुळे रखडला असल्याचे जठार यांनी स्पष्ट केले.

  भारतद्वेषी आणि परकीय शक्तींसाठी मोदींचे नेतृत्व डोईजड होत असल्याने ही शक्ती उद्धव ठाकरे व त्यांच्या फौजेला रसद पुरवत असून या शक्तीच्या हातातील ठाकरे हे बाहुले झाले आहे, असा गंभीर आरोप जठार यांनी केला. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाही आणि त्यांना प्रशासनाचे कोणतेही ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना काही मंडळी चुकीची माहिती देत असतात त्या माहितीच्या आधारे उद्धव ठाकरे हे भूमिका घेत असल्याने पक्षाला आणि त्यांना नुकसान सोसावे लागले. 40 आमदार सोडून गेले हे त्याचे उदाहरण आहे.

  छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अन्य महापुरुष ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही तर जनतेची प्रॉपर्टी आहे, असा टोला जठार यांनी ठाकरेंना लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार राज ठाकरे, नारायण राणे एकनाथ शिंदे हे आहेत. नेतृत्व, दातृत्व हे वारसा हक्काने मिळत नाही तर ते तयार करावे लागेत. वारसा हक्काने केवळ संपत्ती मिळते असे टीकास्त्र जठार यांनी ठाकरेंवर सोडले.

  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पीएम, उद्धव ठाकरे यांना सीएम, विनायक राऊतांना एमपी होण्याची घाई असून त्यांच्या हातून विकासात्मक कोणतेही काम होणार नाही, असा टोला जठार यांनी लगावला. त्यामुळे कोकणाच्या विकासासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना जनतेने निवडून दिले पाहिजे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्याकडे कोकणाच्या विकासाचा अजेंडा आहे, तर विनायक राऊत यांच्याकडे कोकणाच्या विकासाचा अजेंडा नाही.

  दोडामार्ग तालुक्यातील आडाळी प्रकल्प, मुंबई-गोवा माहामार्ग चौपदरीकरणाचा प्रकल्प, आंनदवाडी प्रकल्प हे आपण मार्गी लावले आनंदवाडी प्रकल्पाला ६५ कोटी मी आणले असून विनायक राऊत हे या प्रकल्पांचे फुटकचे श्रेय घेत आहेत. सिडकोच्या माध्यमातून कोणातील जमिनी परप्रांतियांच्या ताब्यात देण्यात डाव असल्याचा आरोप ठाकरेंची फौज करीत आहेत. मात्र, हे आरोप धादांत खोटे आहेत. विनायक राऊत यांनी मागील 10 वर्षांत काजू व आंबा उत्पादकांचे प्रश्‍न व या पिकाला हमीभाव देण्याचा मुद्दा लोकसभेत व्यवस्थित न मांडल्यामुळे हे प्रश्‍न निकाली लागू शकले नाहीत. हे विनायक राऊत यांचे पाप आहे असे प्रमोद जठार म्हणाले.

  उध्दव ठाकरे यांच्या धनदांडग्या नातेवाईकांनी नाणार परिसरातील जागा घेतल्या.हे विनायक राऊत यांनी जाहीर सभेत सांगितले होते. त्यांनी उदाहरणे देवून कबुली दिली. उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांच्या जमिनी असूनही ते रिफायनरीला विरोध करत आहेत हे त्यांचे मोठेपण आहे असे ते म्हणाले होते. धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम मंत्री असलेल्या खात्याच्या सीएसआर मधून विनायक राऊत यांना दोन शौचालय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले नाहीत. त्यामुळे पेट्रोलियम मंत्र्यांना धडा शिकण्यासाठी विनायक राऊत प्रकल्पांना विरोध करतात. अशी टीका प्रमोद जठार यांनी केली.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मेडिकल कॉलेज हे मोदी सरकारची देणं आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे असताना मंजूर झाले. रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केला.मोदींनी प्रत्येक जिल्हात असे कॉलेज मंजूर केले. त्यामुळे या कॉलेजचे श्रेय घेण्याचा अधिकार केवळ सही पुरता उद्धव ठाकरे यांना आहे असे ते म्हणाले.

  चीपीला विमानतळाला आधी विरोध केला. उद्घाटनाच्या वेळी मात्र हिरवा झेंडा घेऊन आले. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे ही यांची ख्याती आहे. त्यामुळे जनतेने आता आपण कोणासोबत जाणार याचा विचार करावा. महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे प्रगतीच्या दिशेने जाणारे व्यक्तिमत्व आहे आणि ठाकरे- राऊत हे अधोगतीच्या दिशेने जाणारी व्यक्तिमत्व आहे. अशी टीका प्रमोद जठार यांनी केली.महायुतीचे उमेदवार नारायण राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. असा विश्वासही प्रमुख जठार यांनी व्यक्त केला.