मुख्यमंत्र्यांना असंस्कृत म्हणणे हास्यास्पद; विनायक राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन प्रहार करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शाब्दिक हल्लाबोल केला आहे. नॉन मॅट्रिक असलेल्या माणसाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अस्कृंत म्हणणे यासारखा दुसरा विनाेद नाही, अशा शब्दात विनायक राऊत यांनी खिल्ली उडवली आहे(Vinayak Raut's attack on Narayan Rane).

    रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन प्रहार करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शाब्दिक हल्लाबोल केला आहे. नॉन मॅट्रिक असलेल्या माणसाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अस्कृंत म्हणणे यासारखा दुसरा विनाेद नाही, अशा शब्दात विनायक राऊत यांनी खिल्ली उडवली आहे(Vinayak Raut’s attack on Narayan Rane).

    मुख्यमंत्र्यांनी जाहिरातबाजी करून सभा घेतली. त्यांचे भाषण बोगस होते, अशा खोचक शब्दात नारायण राणे यांनी टीका केली होती. यावर विनायक राऊत यांनी उत्तर दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यात होणाऱ्या सभेवरुन राऊत यांनी निशाणा साधला आहे. अशा भुईनळ्या खूप उडालेल्या आहेत. त्यामुळे पुण्याच्या सभेकडे आम्हाला गांभीर्याने बघायची गरज नाही, असे ते म्हणाले.

    महाराष्ट्र सरकार ओबीसींना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र दोघांना प्रथम समान न्याय दिला. मात्र नंतर मध्यप्रदेशात चक्र कसे फिरले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.