विनोद लंकेश्री यांच्या सुपारीचे पैसे देणारा मोगली शहरात की जंगलात ? पोलिसांकडून शोध सुरु

    कल्याण : महापालिका कर्मचारी हल्ला प्रकरणी रामनगर पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. मात्र या हल्ल्याचा मुख्यसूत्रधार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पकडण्यात आलेल्या आरोपीना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले गेले. याना हे पैसे मोगली नावाच्या व्यक्तीने दिले होते. आत्ता रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस पथक मोगलीच्या शोधात आहे. हा मोगली शहरात फिरतोय की जंगलात लपला आहे. याचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र भाजप पधिकारी मनोज कटके यांच्यावरील हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाटच आहे. आता या प्रकरणात पोलीस मुख्य आरोपीला शोधणार आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे

    २७ नोव्हेंबरच्या रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास केडीएमसीचे चालक विनोद लंकेश्री यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात आधी सांगितले जात होते की, एका तरुणाने हल्ला केला आहे. जेव्हा रामनगर पोलिसांना तपास सुरु केला. यात धक्कादायक खुलासे समोर आले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके केली गेली. पोलिसांना यश आले. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पाेलिसानी चार जणांना अटक केली. चौघेही आरोपी घाटकोपर येथे राहणारे आहे. ते रिक्षा चालविण्याचे काम करतात. पोलिसाचा तपास सुरु झाला. या पोलिस सुत्रांकडून माहिती समोर आली आहे की, या चौघांना हल्ल्याची सुपारी दिली गेली. प्र्त्येकाला हल्ला करण्यासाठी दहा हजार दिले गेले होते. यांना हे पैसे मोगली नााच्या एका व्यक्तीने दिले आहे. मुंबईत तो मोगली नावाने कुप्रसिद्ध आहे. या व्यक्तिला पोलिस शोधत आहे. हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर विनोद लंकेश्री वर हल्ला करणारा मुख्य सूत्रधार कोण आहे. हे उघड होणार आहे. रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही वर्षापूर्वी भाजप पदाधिकारी मनोज कटके यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना बेदम मारहाण केली होती. घटना सीसीटीव्हीत कैद होती. पोलिस आरोपीपर्यंत पोहचले होते. त्यानंतर रहस्यमय रित्या या प्रकरणाचा तपास बंद झाला. सूत्रधाराला शोधण्यासाठी भाजप आग्रही होती. सत्तेत आल्यावरही सूत्रधाराचा शोध लागला नाही. या प्रकरणासारखाच हा हल्ला होता.