विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडून शिवाजी पार्क मैदानाची पाहणी

हा दसरा मेळावा ऐतिहासिक मेळावा होणार आहे, राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क येथे दाखल होणार आहेत, त्यामुळं पोलिसावर ताण येणार आहे, म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे, याच धरतीवर आज पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre-Patil) यांच्याकडून शिवाजी पार्क मैदानाची पाहणी करण्यात आली आहे.

    मुंबई : शिंदे गटाने बंड केल्यानंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा होत आहे. दरम्यान, अनेकवेळा विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत राडा घालत आहेत, तसेच शिंदे गट व शिवसैनिक (Shivsainik) यांच्यात सुद्धा राडे होताना दिसत आहेत. दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट व उद्धव ठाकरेंची शिवसेनेला (Shivsena) कोर्टाची (Court) पायरी चढावी लागली. यानंतर शिवसेनेला दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी कोर्टानी दिली आहे. परंतू दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका, टिपण्णी होत आहे. यावर राजकारण होताना दिसत आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) व्यवस्थित पार पडावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.

    दरम्यान, शिंदे गट व शिवसेनेच्या जोरदार दावा-प्रतिदाव्यानंतर न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं हा दसरा मेळावा ऐतिहासिक मेळावा होणार आहे, राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्क येथे दाखल होणार आहेत, त्यामुळं पोलिसावर ताण येणार आहे, म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे, याच धरतीवर आज पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre-Patil) यांच्याकडून शिवाजी पार्क मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर नांगरे-पाटील यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केलीय. दरम्यान, दसरा मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.