कृषि प्रदर्शनास देशभरातील शेतकऱ्यांची भेट, दररोज गर्दीचा उच्चांक; नवीन तंत्रज्ञानाकडे कल

बारामती (Baramati) येथील कृषी (Krushi) विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कृषिक २०२३ या कृषी प्रदर्शनात महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरात, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक यासह इतर विविध राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी दररोज गर्दीचा मोठा उच्चांक होत आहे. १७० एकरवर असलेले सर्व प्रक्षेत्र शेतकरी शिस्तबद्धरित्या पाहताना दिसले.

  बारामती : बारामती (Baramati) येथील कृषी (Krushi) विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कृषिक २०२३ या कृषी प्रदर्शनात महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरात, राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेश, कर्नाटक यासह इतर विविध राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी दररोज गर्दीचा मोठा उच्चांक होत आहे. १७० एकरवर असलेले सर्व प्रक्षेत्र शेतकरी शिस्तबद्धरित्या पाहताना दिसले.

  विविध स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी

  विविध भाजीपाला पिकातील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक प्लॉट, फुलपिकातील विविध वाण, त्याची लागवड पद्धत, मातीविना शेतीचे प्रयोग, ग्रीनहाऊसमधील पिके, भरडधान्य व त्याचे प्रक्रिया पदार्थ, मत्स्य पालन इत्यादिसह स्टॉलवरील माहिती योग्य रीतीने घेत होते. विशेष करून डिजिटल ट्यूनेल या बद्दल शेतकर्यांची उस्तुकता दिसून येत होती. कृत्रिम बुद्धीमतत्तेवर आधारित भविष्यातील शेती कशी असेल याची चाहूल शेतकऱ्यांना लागली असल्याचे जाणवले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे तसेच शेतीवरील खर्च कमी करण्याचे शास्वत शेतीचे तंत्रज्ञान पाहून त्याची माहिती शेतकरी घेत असल्यचे दिसले.

  प्रदर्शनास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच प्रक्षेत्रावर ॲग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन केल्याची भावना शेतकऱ्यांनी दिली. या प्रदर्शनामध्ये महिला व तरुण शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत होती. गेले दोन वर्ष जगभरात कोरोना माहामारीमुळे अनेक बंधन होती. परंतु, यावर्षी कुठल्याही बंधनाशिवाय सुरू असलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिल्याचे जाणवत आहे. या प्रदर्शनात शेतकरी स्टार्टर्समधील विविध तंत्रज्ञानाची माहिती त्याचबरोबर जनावरांचे प्रदर्शन, मातीविना शेतीचे प्रयोग पाहून शेतकरी आनंदीत झाल्याचे दिसून येते.

  शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती

  कृषी प्रदर्शन असलेल्या या परिसरात एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने नेटके व शिस्तबद्ध नियोजन पाहून शेती क्षेत्रातील तज्ञ तसेच शेतकरी विशेष कौतुक करत आहेत. दरवर्षी या कृषी प्रदर्शनात अनेक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळत असल्याने महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देत आहेत.

  कारभारी चौकासह इतर चौकात कोंडी

  बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कृषि प्रदर्शनात रविवारी (दि. २२) गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. प्रदर्शनाच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांच्या लंबलचक रांगा लागल्या होत्या. कृषी प्रदर्शनाकडे जाणाऱ्या शहरातील कसबा येथील कारभारी चौकासह इतर चौकात बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.