दिल्लीच्या घटनेचे नागपुरात पडसाद, संसदेतील घटनेनंतर नागपूर अधिवेशनात गॅलरी पासेस देणं केलं बंद!

नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणे बंद केले आहे. दोन्ही सभागृहात गॅलरी पास देणं बंद केलं आहे. लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने तात्काळ हा निर्णय घेतला आहे

  बुधवारी नवी दिल्लीत मोठी घडना घडली. संसदेच कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन जणांनी उडी मारल्याीच खळबळजनक घटना उघडकीस आली. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले आहेत. संसदेतील घटनेनंतर आता राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणे बंद केले आहे. दोन्ही सभागृहात गॅलरी पास देणं बंद करण्यात आलं आहे. विधान परिषद उपासभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात सभागृहात माहिती यांनी दिली.

  आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार

  नवी दिल्लीतील घटनेनंतर आता नागपुरातील विधानभवनात सुरक्षेच्या दृष्टीने बदल करण्यात आलं आहे. आत अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदारांनाच दोन पास दिले जाणार आहेत. अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेतील आजच्या घटनेनंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली. लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनी देखील विधिमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत विधीमंडळ सचिवांकडून माहिती घेतली आहे.

  दिल्लीत नेमकं काय घडलं?

  संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना सुरक्षेत मोठी (Security Breach) झाल्याचं समोर आलं आहे.  संसदेत (Parliament Winter Session 2023) प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सुरक्षा भेदल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. प्रेक्षक गॅलरीतून (Audience Gallery) दोघांनी उडी मारल्याने भर लोकसभेत (Lok Sabha) एकच हल्लकल्लोळ माजला.  मिळालेल्या माहितीनुसार,  तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी एकाने गॅलरीतून खाली उडी मारली. त्याच्याकडे कलर स्प्रे (Color Spray) होतो आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळली.

  दोन जण ताब्यात

  संसदेतील प्रेक्षक गॅलरीतुन उडी मारल्या प्रकरणी नीलम कौर सिंह आणि अमोल शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
  अमोल शिंदे मूळचा लातूरचा असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्हीही आरोपी दिल्लीतील (Delhi) संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) इथे आंदोलन करत होते. या दोघांकडे कलर स्मोक होते.