शेती विकून विठुरायाला 25 तोळ्यांचा सोन्याचा करदोडा, रुक्मिणीस 2 तोळ्याचे मंगळसूत्र

विठूरायाच्या दर्शनासाठी अबालवृद्ध जीवाचे रान करतातच पण त्याच्या काैतुकासाठी भाविक काहीही करायला तयार असतात. अशाच एका भक्ताने विठ्ठल भक्तीतून आपली सहा एकर शेती विकून विठुरायासह रुक्मिणी मातेला साेन्याची आभूषणे केली आहेत.

    पंढरपूर : महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठूरायाने सर्वांच्या हदयात अढळ स्थान मिळविले आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी अबालवृद्ध जीवाचे रान करतातच पण त्याच्या काैतुकासाठी भाविक काहीही करायला तयार असतात. अशाच एका भक्ताने विठ्ठल भक्तीतून आपली सहा एकर शेती विकून विठुरायासह रुक्मिणी मातेला साेन्याची आभूषणे केली आहेत.

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठुरायाच्या चरणी धाराशिव जिल्ह्यातील बाई लिंबा वाघे या विठ्ठल भक्ताने स्वत:ची सहा एकर शेती विकून लाडक्या विठुरायाला 18 लाख रुपयांचा 25 तोळ्याचा सोन्याचा करदोडा अर्पण केला आहे.

    बाई लिंबा वाघे यांची धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी या गावात 11 एकर शेती आहे. त्यांना वारसदार नसल्याने त्यांनी 78 लाखाला सहा एकर शेती नुकतीच विकली आहे. शेती विकून आलेल्या पैशातून आपल्या लाडक्या विठुरायाला 18 लाख रूपयांचे 25 तोळे वजनाचा सोन्याचा करदोडा तसेच रुक्मिणी मातेला दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले आहे.

    बाई लिंबा वाघे यांच्या विठ्ठल भक्तीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तसेच त्यांच्या या कार्याचे भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील कौतुक केले जात आहे.