Vivek Lingaraj's appeal for employees

  सोलापूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेतन थकीत असलेले जिल्हा परिषद युनियनच्या पाठपुराव्यामुळे अदा करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. युनियनचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पुढाकार घेतला.

  वेतन अदा झाल्याने समाधान व्यक्त

  ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य विभागातील सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे वेतन प्रलंबित होते. सप्टेंबर महिन्याचे वेतन निधी प्राप्त करून घेतले यामध्ये साधारण साडेसहाशे कर्मचारी यांचे वेतन व सण अग्रीम करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.

  मंत्रालयस्तरावरुन सकारात्मक प्रतिसाद

  ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील साधारण 100 कर्मचारी यांचे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे वेतन व सण अग्रीम प्रलंबित होते. यासाठी शासन स्तरावरून निधी आणण्यापासून प्रयत्न करण्यात येत असताना मंत्रालयस्तरावरुन सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

  प्रवीण गेडाम कृषी आयुक्त यांची मोलाची साथ

  कृषी विभागातील 80 कर्मचाऱ्यांसाठी कृषी आयुक्तालयातून निधी प्राप्त करून घेण्यासाठी प्रवीण गेडाम कृषी आयुक्त यांची मोलाची साथ लाभली. ग्राम विकास विभागातील अनुदानसुद्धा ग्राम विकास विभाग मंत्रालय यांनी तातडीने सर्वात आधी निधी प्राप्त करून देण्यात आला.

  महिला बालकल्याण व पशुसंवर्धन विभागाकडून वेतन

  महिला बालकल्याण व पशुसंवर्धन विभागाकडून वेतन व सण अग्रीमसुद्धा पाठपुरावा करण्यात आला. बांधकाम विभागातील विशेषता मैल मजूर कर्मचाऱ्यांचे दोन महिनेच वेतन देण्यात आले. यासाठी सर्व संबंधित विभागाकडील वेतन निधीचे काम करणारे सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी, अर्थ विभागाकडील कोषागार कार्यालयाकडील कामकाज पाहणारे अधिकारी कर्मचारी, कॅफो मीनाक्षी वाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी वेतन व सण अग्रीम वेळेत व्हावे यासाठी अत्यंत दक्षतेने, स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन, ही देयके पारित होण्यासाठी आवश्यक सूचना केल्या.

  जिल्हा कोषागार अधिकारी सर्फराज मोमीन व उपकोषगार अधिकारी वसीम बागवान ऑडिटर श्रीकांत होसमनी प्रधान सचिव संजय खंदारे उपसचिव गेंगजे यांचे सहकार्य लाभले. समीर शेख, त्रिमूर्ती राऊत रोहिणी सुगंधी चाऊस तजमुल मुतवली, एस पी माने विलास मसलकर संतोष शिंदे, श्रीशैल देशमुख, राकेश सोडी महिला उपाध्यक्ष सविता काळे विक्रम वाल्मिकी राजेंद्र मानवी मल्लिकार्जुन स्वामी भूषण काळे राजू नायर अंबिका वाघमोडे अमित शहा दत्तात्रय गुरव नवनाथ वास्ते सचिन आंबेकर शामेल अडाकुल गजेंद्र कुमठेकरलक्ष्मण झिपरे विजय आदलिंगेदत्तात्रय घोडके गुंडूराज कारंडे योगेश हब्बु, प्रफुल रणदिवे आदींनी परिश्रम घेतले.