निलंग्यातील गावात भूगर्भातून आवाज; गावकऱ्यांना १९९३ ची आठवण

तीन दिवसापूर्वी निलंग्याचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी हासोरी गावाला भेट दिली. यावेळी भूकंप झाल्याची कोठेही नोंद झालेली नसून तीन दिवस भूगर्भातील हालचालींचा आवाज असल्याचे सांगून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिक भयभीत झाले असून हासोरीत भूकंपमापक यंत्र बसवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

    लातूर : निलंगा (Nilanga) तालुक्यातील हासोरी येथे सात दिवसात चार वेळा भूगर्भातून आवाज (Voices From Underground) आला आहे. या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण (Climate Of Fear) असून गावकरी (Villagers) रात्र जागून काढत आहेत. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भूगर्भातून जोरदार आवाज आला. लोक झोपण्याच्या तयारीतच असतानाच घरातून बाहेर पळ काढला.

    अगोदर पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच मागील सात दिवसात भूगर्भातून आवाज येण्याची ही चौथी वेळ आहे. तसेच, जमीन हादरत असल्याने याबाबत माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या भूगर्भशास्त्र विभागाने (Geology Department) स्पष्ट सांगितले आहे की हा भूकंप नव्हे तर भूगर्भातील होणाऱ्या हालचालीचा आवाज आहे. मात्र, त्यावर कोणतेही नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याने प्रशासन हतबल आहे. हासोरी गावातील ग्रामस्थांच्या मनात भूकंपाची भीती असल्याने संपूर्ण गाव घराबाहेर जागे होते. तर काहींना १९९३ च्या भूकंपाची आठवण होत आहे.