Action will be taken against absentee employees in election work as per rules: Collector Suhas Diwase's order

    पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून यामध्ये मतदार यादी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया वर्षभर सुरू असते. जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेबाबतची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषद घेत दिली. दिवसे म्हणाले, मतदार यादीसाठी काही वेळेला विशेष मोहीम हाती घेतली जाते. 23 जानेवारी 2024 अगोदर त्यात पुणे जिल्ह्याचे एकूण मतदार 81 लाख 27 हजार एकोणीस होते.

    पुणे, मावळ आणि शिरूरमध्ये नामांकन प्रक्रिया

    19 एप्रिलपासून पुणे, मावळ आणि शिरूर या मतदारसंघांमध्ये नामांकन प्रक्रिया सुरू होत आहे. तर 12 एप्रिलपासून बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये नामांकन प्रक्रियेस सुरुवात होत आहे. 9 एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील नवीन मतदार अर्ज स्वीकारले जातील. तसेच, 15 एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत पुणे, मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातील नवीन मतदार अर्ज स्वीकारले जातील. यामध्ये फक्त नवीन मतदाराचाच समावेश असेल. त्यात दुरुस्ती, बदल या गोष्टी नसतील.

    रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 पर्यंतच्या मतदार यादीत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 82 लाख 92 हजार 951 मतदार आहेत. यामध्ये एक लाख 56 हजार 720 नवीन मतदारांचा समावेश आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण 8 हजार 382 मतदान केंद्र आहेत. या ठिकाणी पाणी, वैद्यकीय पथक, पार्किंगची सुविधा, स्वच्छतागृह,वृद्ध अपंग यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 35 ठिकाणी सोसायटीमध्ये मतदान केंद्र आहेत. यामध्ये वडगावशेरीत 7 केंद्र. कोथरूडमध्ये 8 केंद्र, खडकवासलामध्ये 15 केंद्र, भोरमध्ये 5 केंद्र आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.