सर्व २८५ आमदारांची मते ठरली वैध, काही वेळात होणार विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदान केले. काँग्रेसने भाजप उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणी रखडली होती. मात्र, आधी राज्य निवडणूक आयोग आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले.

    मुंबई – अखेर दोन तासांच्या विलंबानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सर्व २८५ (285 MLAs declared valid) आमदारांची मते वैध ठरली आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा निकाल काय येतो याची उत्सुकता सर्वांना लागलीय. ( The counting of votes)

    विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदान केले. काँग्रेसने भाजप उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे मतमोजणी रखडली होती. मात्र, आधी राज्य निवडणूक आयोग आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले. मात्र, त्यामुळे मतमोजणी दोन तास रखडली.

    लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावेळी दोन सहकारी उपस्थित होते, असा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तर अशोक चव्हाण यांनी दोन्ही मते रद्द करावी अशी मागणी केली आहे. मात्र, काँग्रेसच्या आक्षेपाला अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर परवानगी घेऊनच टिळक आणि जगताप यांनी मतदान प्रकियेत मदत घेतली, असा दावाही त्यांनी केला.