वासुदेवांमार्फत कल्याणमध्ये मतदान जनजागृती, गावांमध्ये राबविले उपक्रम

मोठया प्रमाणात नागरिकांनी “आम्ही मतदान करणार आणि तुम्ही पण मतदान करा” अशा घोषणा दिल्या.

    कल्याण : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत कल्याण लोकसभेत कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात मतदान जनजागृतीसाठी विविध जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे. याच अनुषंगाने कल्याण पूर्वचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील डावलपाडा, वसार, मानेरे, आशेळे, खडेगोळवली या गावात जाऊन वासूदेवांमार्फत पथनाटय सादर करुन मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

    याठिकाणी मोठया प्रमाणात नागरिकांनी “आम्ही मतदान करणार आणि तुम्ही पण मतदान करा” अशा घोषणा दिल्या. लाऊड स्पिकरव्दारे मतदान जनजागृतीपर गीत वाजवून मतदान करण्याबाबतचा संदेश गावातील नागरिकांना देण्यात आला. यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी स्टुडंट ऑयकान प्रणव देसाई, समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडाळे, मिडीया टिमचे उमेश यमगर, निलेश चव्हाण उपस्थित होते.