राज्यसभेसाठी आज होणार मतदान; सहा जागांसाठी दिग्गजांमध्ये चुरस

सहाव्या जागेसाठी लढत होणार आहे. इतर छोटे पक्ष, अपक्ष आमदारांच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.

    राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी नऊ ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडेल त्यानंतर पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सातवा उमेदवार दिल्याने भाजप आणि महाविकासआघाडी साठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

    एकूण सात उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून, त्यापैकी सहाव्या जागेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक, तर भाजपाने तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकूण सहा जागांसाठी निवडणूक होणार असली तरी एकूण सात उमेदवार लढवणार अहेत. एकूण पाच जागा सहज निवडून येतील. मात्र, सहाव्या जागेसाठी लढत होणार आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजप, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.