लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु! सकाळी 11 पर्यंत कुठे किती टक्के झाले मतदान ?

महाराष्ट्रातील पाच मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक पार पडणार आहे. सकाळी ११ पर्यंत किती टक्के मतदान पार पडले याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

    पुणे – आजपासून सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशातील मतदानाचे महापर्व सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आजपासून पार पडत आहे. लोकसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून भाजप नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडी या दोन्ही आघाडींसाठी यंदाची लोकसभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील पाच मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक पार पडणार आहे. सकाळी ११ पर्यंत किती टक्के मतदान पार पडले याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

    लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे. राजकीय नेत्यांनी देखील जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत पार पडलेल्या मतदानामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे.

    आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सकाळी 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 19.17 टक्के मतदान झालं आहे. सकाळी 11 पर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 17.53 टक्के तर रामटेकमध्ये 16.14 टक्के मतदान पार पडले आहे. त्याचबरोबर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 19 टक्के आणि भंडारा- गोदिंया मतदारसंघामध्ये 19.72 टक्के मतदान पार पडले आहे. सर्वांत जास्त मतदान हे गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये झाले आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 25 टक्के मतदान गडचिरोली चिमूर येथे झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंतच मतदान असणार आहे. हा भाग नक्षली असल्याने वेळेची मर्यादा पाळण्यात येणार आहे.