राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, बड्या नेत्यांची प्रतीष्ठा पणाला; गुलाल कोण उधळणार?

राज्यात आज, रविवारी ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. जवळपास २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदे तर, सरपंचांच्या १३० रिक्त पदांसाठी या निवडणुका होणार आहेत.

    मुंबई : राज्यात आज, रविवारी ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. जवळपास २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदे तर, सरपंचांच्या १३० रिक्त पदांसाठी या निवडणुका होणार आहेत. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान करत येणार आहे.

    गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.तर गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.

    शिवसेनेत पडलेली फूट व माविआ सरकारचे पायउतार होणे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट या पार्श्वभूमीवर राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच मतदारांचा कल यातून समोर येणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसल्याने निकालांनंतर सगळेच पक्ष आपणच पुढे असल्याचा दावा करतात. मात्र पक्षांतर्गत मात्र मतदार नक्की कोणत्या बाजूने आहे याची स्पष्टता या निमित्ताने होत असते. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.