मंगळवेढयातील 27 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उद्या मतदान; पाच संवेदनशील गावावर पोलिसांची करडी नजर

मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी रविवार (दि. 5) नोव्हेंबर रोजी मतदान होत असून यासाठी 690 कर्मचारी नेमले आहेत. दरम्यान, जालिहाळ, लक्ष्मीदहीवडी, आंधळगांव, रड्डे, पडोळकरवाडी आदी गावे संवेदनशील असल्यामुळे येथे पोलिसांची जादा कुमक नेमण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.

    मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी रविवार (दि. 5) नोव्हेंबर रोजी मतदान होत असून यासाठी 690 कर्मचारी नेमले आहेत. दरम्यान, जालिहाळ, लक्ष्मीदहीवडी, आंधळगांव, रड्डे, पडोळकरवाडी आदी गावे संवेदनशील असल्यामुळे येथे पोलिसांची जादा कुमक नेमण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले. निवडणूक प्रकियेसाठी सर्व प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

    महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 3 ऑक्टोबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकी बाबतचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मंगळवेढा तालुक्यातील एकूण 27 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक व एका ग्रामपंचायत मध्ये पोट निवडणूकीचा समावेश आहे. तालुक्यातील ब्रम्हपुरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

    या निवडणुकीसाठी एकूण 94 केंद्रावरती मतदान होणार असून, त्यासाठी 115 मतदान पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई तसेच राखीव पथकातील कर्मचारी असे एकूण 690 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी एकूण 94 कंट्रोल युनिट व 135 बैलेट युनिट वापरण्यात येणार आहेत.

    निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून 23 निवडणूक निर्णय अधिकारी, 23 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसील कार्यालयातील 9 अव्वल कारकून, 8 मंडळ अधिकारी, 38 तलाठी, 6 महसूल सहायक, 4 शिपाई, 40 कोतवाल नेमण्यात आले आहेत.

    मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी, शिरशी, खडकी, जुणोनी, देगाव, अकोले, बठाण, उचेठाण, महमदाबाद हुन्नर, रेवावाडी, चिक्कलगी, भाळवणी, जंगलगी, डीकसळ, मुंढेवाडी, खुपसंगी, निंबोणी, लोणार, लमाणतांडा, मानेवाडी, लक्ष्मी दहिवडी, रड्डे, नंदूर, आंधळगाव, पडोळकरवाडी, जालिहाळ, हिवरगाव या गावातील एकूण 70 उमेदवार सरपंच पदासाठी तर एकूण 517 उमेदवार सदस्य पदासाठी आपले रायकिय भवितव्य आजमावत आहेत. ही निवडणूक प्रक्रिया तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे, सोमनाथ साळुंखे,संदीप हाडगे आदी पार पाडत आहेत.