राज्यसभेच्या वेळी झालेल्या चुका पुन्हा होऊ नये, यासाठी शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये दिलं जातंय मतदानाचं प्रशिक्षण

मुंबईत हॉटेल वेस्ट इनमध्ये शिवसेना आमदारांना (Hotel west in Shivsena MLA) ठेवलं असून, त्यांना मतदानाचं प्रशिक्षण (Voting traning) दिलं जात आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची रंगीत तालीम करुन घेतली जात आहे. राज्यसभेच्या वेळी मतदानात जी चूक झाली ती होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

    मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुका (Rajya sabha election) पार पडल्यानंतर आता राजकीय पक्षांनी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) रणनिती आखायला तसेच मतांची जुळवाजुळव करण्याची तयारी सुरु झाली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरल्याने 20 जूनला (सोमवारी) निवडणुकीचा (MLC Election on 20 June 2022) आखाडा रंगणार आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार असून, क्रॉस व्होटिंग (Cross Voting) तसेच घोडबाजार किंवा दगाफटका होऊ नये, यासाठी सर्वंच पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. तसेच अपक्षांच्या मनधरणीसाठी भाजपा तसेच मविआ (BJP and MVA) कामाला लागली आहे.

    सध्या अपक्ष आमदारांची जमवाजमव करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. एक-एक मतांसाठी कोण रेल्वेनं प्रवास करुन विरारला जात आहे, तर कोण भेटीगाठी घेत आहे. तर काहींनी अपक्षांना फोन केलेत. अपक्षांची गरज सर्वंच पक्षांना असल्यामुळं बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना सर्व उमेदवार जाऊन भेटताहेत. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीने आपआपल्या आमदारांना सुरक्षित हॉटेलमध्ये ठेवले आहे. दरम्यान, मुंबईत हॉटेल वेस्ट इनमध्ये शिवसेना आमदारांना (Hotel west in Shivsena MLA) ठेवलं असून, त्यांना मतदानाचं प्रशिक्षण (Voting traning) दिलं जात आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची रंगीत तालीम करुन घेतली जात आहे. राज्यसभेच्या वेळी मतदानात जी चूक झाली ती होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. शिवसेना आमदारांची (Shivsena MLA) बैठक होणार असून, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) शिवसेना आमदारांशी गटागटाने संवाद साधणार आहेत. वेस्ट इन हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुक्कामाला थांबले आहेत. तर वरळीतील फोर सिझन हॉटेलमध्ये काँग्रेसचे आमदार थांबणार असून, मतं फुटू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.

    दरम्यान, आज उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी (NCP Leader Ajit Pawar press conference) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्दांना हात घातला. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी (Rajya sabha election) जी काही चूक झाली ती यावेळी होणार नाही, मत बाद होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीतही (MLC Election) चमत्कार घडेल. तसेच मविआचे उमेदवार निवडूण येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.